‘शासकीय संदेश प्रसार धोरण 2018’ या सरकारी धोरणामुळे  महाराष्ट्रातील छोटी  आणि मध्यम वृत्तपत्रे तसेच साप्ताहिकं अडचणीत आली आहेत.या विरोधात मराठी पत्रकार परिषदने लढा उभारलेला आहेच.ही लढाई व्यापक आणि सर्वसमावेशक स्वरूपात लढली जावी यासाठी मराठी पत्रकार परिषद या विषयातील जाणकार पत्रकार-संपादकांची एक समिती नियुक्त करीत आहे.

मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असेल.त्यामध्ये शर्मा यांच्या व्यतिरिक्त परिषदेचे कार्याध्यक्ष गजानन नाईक( सिंधुदुर्ग ) बंडू लडके ( चंद्रपूर ) घोणे ( लातूर ) नरेंद्र कांकरिया ( बीड ) अ‍ॅड.बिभिषण लोकरे ( उस्मानाबाद ) आदि पत्रकारांचा समावेश असेल.जाहिरात विषयातील जाणकार असलेल्या अन्य कोणाला या समितीत कार्य करायचे असेल तर सिध्दार्थ शर्मा यांच्याशी संपर्क साधावा.ही समिती विषयाचा पाठपुरावा करेल.आणि लढा यशस्वी करण्यासाठी कार्य करेल.परिषदेचे अन्य पदाधिकारी या समितीला सर्वतोपरी सहकार्य करतील.

अनिल महाजन,

सरचिटणीस

मराठी पत्रकार परिषद,मुंबई –

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here