मराठवाडयात आणि कोकणात फरक काय?

0
1189

मराठवाडयात आणि कोकणात फरक काय?

मध्यंतरी मराठवाडयातील भीषण दुष्काळी परिस्थिती मांडणारी एक पोस्ट मी टाकली होती.. त्यावर प़तिक़िया देताना मुंबईतील एका ज्येष्ठ पत्रकार मित्राने “या स्थितीला मराठवाडयातील जनताच जबाबदार असल्याने मराठवाडयातील जनतेबददल जराही सहानुभूती बाळगण्याचे कारण नाही” असं मत नोंदविलं होतं. आज लोकसततानं कोकणातील भीषण पाणीटंचाईवर प़काश टाकला आहे. कोकणात बहुतेक ठिकाणी ३५०० मिली मिटर पेक्षा जास्त पाऊस पडतो.. तरीही न चुकता दरवर्षी तिकडे पाणी टंचाई असते.. यंदाची स्थिती अधिक गंभीर आहे.. एकट्या रायगड जिल्ह्यात २०३३ गावं आणि वाड्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी सरकारनं ९४० लाखांचा आराखडा तयार केला आहे.. निसर्गरम्य कोकणात पाण्यानं भरलेले टॅंकसॅ इकडे तिकडे पळताना पाहून कासावीस होते. या परिस्थितीचे कारण योग्य नियोजनाचा अभाव असल्याचं बातमीत म्हटलं आहे… मराठवाडयातील दुष्काळाचं कारण देखील हेच आहे.. त्याचं खापर मराठवाडी जनतेवर फोडणयाचं कारण नाही.. शेतकरयांनी मोठ्या प्रमाणावर ऊस लावला पण त्यासाठी प्रोत्साहन सरकारनंच दिलं.. एका एका तालुक्यात तीन तीन, चार चार साखर कारखानयांना परवानग्या देताना सरकारनं पाणी स्थिती पेक्षा राजकारण पाहिलं.. त्यामुळं त्याबद्दल शेतकर्यांना दोष देण्याचं कारण नाही. “महाराष्ट्रात पाण्याचं योग्य नियोजन झालं नाही तर येत्या काही दिवसांत महाराष्ट्राचा राजस्थान होईल” असं भाकित जलतज्ज्ञ राजेंद्रसिंहजी यांनी व्यक्त केलं आहे.. म्हणजे एकमेकांवर खापर फोडत बसण्यापेक्षा आणि मुंबईत बसून एखाद्या प्रदेशाचा अवमान करणारी भाषा करण्यापेक्षा पाऊस आणि पाण्याचं योग्य नियोजन कसं करता येईल यासाठी सवॅ पातळ्यांवर प्रयत्न होण्याची गरज आहे. मराठवाडयात अनेक ठिकाणी पाचशे ते साडेपाचशे मिलीमीटर पाऊस पडतो.. मोठ्या प्रमाणात झाडं तोडली गेल्यानं पाऊस कमी होतोय हे खरंच.. त्यासाठी उशिरा का होईना प्रयत्न सुरू आहेत. आमच्या उदगीरच्या पत्रकार मित्रांचं अभिनंदन यासाठी की त्यांनी “हरित उदगीरची” चळवळ सुरू करून घरटी एक तरी झाड लावायचं आणि ते जगवायचा संकल्प सोडला आहे.. सरकारची १४ कोटी झाडं लावल्याची वल्गना फसवी आहे.. लोकांनाच आता त्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल.. याची मराठवाडयात आणि कोकणातही गरज आहे.. मुद्दा लोकसत्ताने मांडलयासारखा योग्य नियोजनाचा आहे.. त्यासाठी राजकारण बाजूला ठेवून प्रयत्न व्हायला हवेत.. लोकांनी देखील त्यासाठी आग्रह धरला पाहिजे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here