अभिनंदनीय निर्णय

0
806

काल रायगड जिल्हयात माणगावला होतो.ज्येष्ठ पत्रकार प्रकाश काटदरे यांचे नुकतंच काविळीने निधन झाले.रायगड प्रेस क्लबनं त्यांच्या श्रध्दांजली सभेचे आयोजन केलं होतं.प्रकाश काटदरे यांच्या आठवणीनं सारेच अस्वस्थ होते.पत्रकारांचे प्रकृत्तीकडे होत असलेल्या दुर्लक्ष आता सार्वत्रिक चिंतेचा विषय झालेला आहे.काटदरेंच्या बाबतीत हेच घडलं.योग्य वेळेत,चांगले उपचार झाले नाहीत.योग्य वेळेत उपचार झाले तर काविळ बरी होऊ शक ते .पण काटदरेंच्या बाबतीत ते घडलं नाही.त्यामुळंंंंंं रायगडमधील एक धडाडीचा पत्रकार आपल्याला गमवावा लागला.जगाच्या उठाठेवी करणाऱ्या बहुसंख्य पत्रकारांना आर्थिक नियोजन जमत नसल्यानं त्यांच्या माघारी त्यांच्या कुटुंबांची मोठी कुचंबना होते.प्रकाश काटदरे यांच्या कुटुंबावर अशी वेळ येऊ नये अशी भावना श्रध्दांजली सभेत सर्वांनीच व्यक्त केली.त्यासाठी आर्थिक मदत म्हणून 51 हजारांची मदत रायगड प्रेस क्लबच्यवतीने त्यांच्या कुटुंबाला कऱण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे.
मोठी अडचण मुलीच्या शिक्षणाची आहे.त्यांची मुलगी सिंधुदुर्गात शिक्षण घेते.इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात ती आहे.तिचं शिक्षण अर्धवट राहू नये अशीच साऱ्यांची इच्छा आहे.त्यादृष्टीनेही प्रयत्न कऱण्याचे ठरविले आहे. रायगड प्रेस क्लबला याबद्दल द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत.काऱण समाजाच्या पत्रकारांकडून खंडीभर अपेक्षा आहेत पण पत्रकारावर वेळ आली तर त्याच्या मदतीसाठी कोणीच पुढे येत नाही हा नेहमीचा अनुभव आहे.अशा स्थितीत इतरांच्या मदतीची अपेक्षा करीत न बसता,वाट न बघता आपणच आपल्यासाठी मदत कऱणे ही महत्वाची गोष्ट आहे.रायगड प्रेस क्लबने ते केले आहे.त्याबद्दल प्रेस क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपुर्वक आभार.मागे रत्नागिरीतही एका पत्रकाराचे असेच अचानक निधन झाले तेव्हीही तेथील पत्रकारांनी एकत्र येत निधी जमा केला आणि तो पत्रकाराच्या नातेवाईकांना दिला.सातारा जिल्हयातील पत्रकारांनीही सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे  यांच्या पुढाकाराने अचानक निधन झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबासाठी मदत केली होती.पत्रकार आणि पत्रकार संघटनांच्या मध्ये ही जाणीव निर्माण होत आहे हेच आपल्या चळवळीचे यश आहे असे मी मानतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here