स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मतदानाच्या दिवशी तुम्ही जर मतदान करून माथेरानला गेलात तर तुम्हाला हॉटेलच्या भाडयात घसघसीत 20 टक्के सवलत मिळणार आहे.शिवाय गृहनिर्माण संकुलातील नागरिकांनी शंभर टक्के मतदान केले तर बाईक हॉटेलच्यावतीने डिस्कॉऊंट कुपन देण्याची योजना आखली गेली आहे.अशी माहिती माथेरान हॉटेल मालक संघटनेचे अध्यक्ष अनिल पतोडीया यांनी दिली.मतदानाच्या दिवशी सुटी असल्याने अनेक मतदार मतदान टाळून पर्यटनाला निघून जातात ,त्याचा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होतो.हे टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने राज्यातील माथेरान,लोणावळा,महाबळेश्‍वर आदि पर्यटनस्थळावरील हॉटेल मालकांची नुकतीच मुंबईत बैठक बोलाविली होती.त्यावेळी झालेल्या चर्चेत मतदान करून पर्यटनाला येणार्‍यांना विशेष सवलत देण्याचा निर्णय झाला आहे.मात्र मतदानाचे पवित्र कर्तव्य पार न पाडता पर्यटनाला जाणार्‍यांना रूम न देण्याची सूचना देखील कऱण्यात आली असल्याचे समजते.ही सूचना हॉटेलन आपल्या वेबसाईटवरही टाकावी असे आवाहनही केले आहे.निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या या प्रयत्नाचा नक्कीच चांगला परिणाम होईल अशी शक्यता वर्तविली जात आहे –

LEAVE A REPLY