मंत्रालय वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी प्रविण पुरो

  0
  1140

  मुंबई,दि.३१ (प्रतिनिधी)- मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वार्षिक निवडणूकीत अध्यक्षपदी प्रविण पुरो तर उपाध्यक्षपदी प्रमोद डोईफोडे,
  कार्यवाहपदी मंदार पारकर कोषाध्यक्ष म्हणून महेश पवार विजयी झाले. तर कार्यकारीणी सदस्य म्हणून श्यामसुंदर सोन्नर, डॉ.नितीन तोरस्कर, प्रफुल्ल
  साळुंखे, झहीर सिद्दीकी, प्रविण राऊत विजयी झाले.मंत्रालय वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणूकीत प्रविण पुरो यांना (३०), उदय तानपाठक (२९), सदानंद qशदे (२८) राजेंद्र थोरात (१६) तर सदानंद खोपकर (१२) मते मिळाली. विद्यमान अध्यक्ष थोरात यांना चौथ्या क्रमांकावर जात दारुण पराभव पत्करावा लागला.उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निकराच्या लढाईत प्रमोद डोईफोडे यांना (४१),खंडुराज गायकवाड (३९), दिलीप जाधव (३२) मते मिळाली. वर्षानुर्षे वार्ताहर संघाच्या निवडणूकीत विजयी होणारे खंडुराज गायकवाड यांचा पराभव झाला हे विशेष.कार्यवाह पदासाठी झालेल्या दुहेरी लढतीत विद्यमान कार्यवाह मंदार पारकर (९१) मते मिळवून विजयी झाले. त्यांच्या विरोधात लढत देणारे संजीवन ढेरे यांना (२३)मतांवर समाधान मानावे लागले.कोषाध्यक्षपदासाठी झालेल्या लढाईत विद्यमान कोषाध्यक्ष महेश पवार (६१) मते मिळवून विजयी झाले. तर पुरुषोत्तम आवारे-पाटील यांना (५२) मते मिळवत पराभव पत्करावा लागला. कार्यकारणी सदस्य पदासाठी झालेल्या पाच जागांसाठी झहीर सिद्धीकी (६७), प्रफुल्ल साळुंखे (६६), शामसुंदर सोन्नर (५९), प्रविण राऊत(५९) तर डॉ. नितीन तोरस्कर (५४) मते मिळवून विजयी झाले.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here