भोर ः सारे नियम पायदळी तुडविणारे सरकारी अधिकारी सत्य बातमी छापली की.कसे पिसाळतात आणि थेट शिविगाळ कऱण्यापर्यंत त्यांची कशी मजल जाते याचं अलिकडंचं उदाहरण म्हणून भोरचे पत्रकार माणिक पवार यांना तेथील वैद्यकीय अधिकार्याने दिलेल्या धमक्यांकडं पाहता येईल.भोरच्याच नव्हे तर राज्यातील शासकीय रूग्णालायांची अथवा उपजिल्हा रूग्णालयांची अवस्था आता मृतप्राय झाली आहे.अनागोंदी,बेपर्वाई,निष्काळजीपणा.अरेरावी,डॉक्टरांची अनुपस्थिती ही सारी शासकीय रूग्णालयाची व्यवच्छेदक लक्षणं झाालेली आहेत.या सार्या कारभारावर आसूड ओढणार्या सत्य बातम्या माणिक पवार यांनी प्रसिध्द केल्या होत्या.यावर वैद्यकीय अिधिकारी डॉ.बी.बी.बामणे संतापले आणि त्यांनी फोन करून माणिक पवार यांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली.दमदाटीही केली.त्याची रेकॉर्डिंग पवार यांच्याकडं आहे.माध्यमांबद्दलही त्यांनी अपशब्द वापरले असं माणिक पवार याचं म्हणणं आहे.डॉ.बामणे यांच्या या अरेरावीच्या विरोधात काल राजगड पोलिसांत गुन्हा दाखल केला गेला आहे.तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडं तक्रारही केली गेली आहे.रूग्णांना वार्यावर सोडणार्या डॉ.बामणे यांची बदली करावी अशी मागणी करण्यात आली आहे.वैद्यकीय अधिकार्याच्या अरेरावीच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार असल्याचे पुणे जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने सांगण्यात आलं आहे.एस.एम.देशमुख यांनी माणिक जगताप यांच्याशी संपर्क करून राज्यातील पत्रकार त्यांच्या पठिशी असल्याचा विश्वास त्यांना दिला आहे.भोर तालुका पत्रकार संघ,जिल्हा पत्रकार संघ तसेच विविध पत्रकार संघांनी या घटनेचा निषेध केला आहे.–