भिगवण भेट

0
545

भिगवण हे इंदापूर तालुक्यातील महत्वाचं ठिकाण.. तीन जिल्हे आणि पाच तालुक्याच्या सीमेवरच हे गाव.. भौगोलिक, सामाजिक, राजकीयदृष्ट्या महत्वाचं .. स्वाभाविकपणे इथं पत्रकारिता देखील बरयापैकी विकसित झालेली .. परिसरात ३५ पत्रकार आहेत.. त्यांनी एकत्र येत ” भिगवण मराठी पत्रकार संघ” स्थापन केलाय.. विशेष म्हणजे त्यांचं स्वतः चं कार्यालय देखील आहे.. बहुतेक पत्रकार उच्च शिक्षित आहेत.. त्याची एकजूट, परस्पर आपलेपणा, आदरभाव पाहून छोट्या गावातही एवढं चांगलं पत्रकार संघटन होऊ शकतं हे पाहून दिल खूष हुआ.. ..
काल इंदापूरहून येताना त्यांनी मला भिगवणला येण्याची विनंती केली.. खरं तर कंटाळलो होतो, थकलो होतो.. पण पत्रकारांना मी नाही म्हणू शकत नाही..त्यामुळं भिगवण पत्रकार संघाच्या कार्यालयाला भेट दिली.. तेथील पत्रकारांशी संवाद साधला.. काही विषय नव्यानं समोर आले.. आनंद वाटला.. मी भिगवणला जायचा कंटाळा केला असता तर एक चांगली संधी मी चुकवली असं झालं असतं.. सोबत शरद पाबळे, बापुसाहेब गोरे, सुनील लोणकर, सुनील जगताप, जनार्दन दांडगे हे मित्र होते..
भिगवण तालुका नाही.. पण तेथील पत्रकारांनी स्वतंत्रपणे संघ स्थापन केला आहे.. राज्यात जी शहरं तालुक्याची ठिकाणं नाहीत मात्र तेथे नगरपालिका आहेत, नगर पंचायती आहेत अशा मोठ्या गावात यापुढं मराठी पत्रकार परिषद आपल्या शाखा सुरू करणार आहे.. भिगवणमधये हा निर्णय झाला.. त्या अर्थानं भिगवणची भेट फलदायी ठरली..
अध्यक्ष प्रशांत चौरे, प़ाचार्य क्षीरसागर, संस्थापक देशमुख आणि अन्य सर्व भिगवणकर मित्रांनो, आपला आभारी आहे, आपण आपलेपणाने आम्हाला बोलावलं, स्वागत केलंत.. मजा आली..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here