अलिबाग-महाराष्ट्रातील भाजप सरकारला पाठिंबा देऊन राष्ट्रवादीने चूक केल्याचे मत आज सकाळी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केल्याने पाठिंब्याच्या मुद्यांवरून पक्षातील मतभेद समोर आले आहेत.
अलिबाग येथे कालपासून राष्ट्रवादीचे चिंतन शिबीर सुरू आहे.शिबिराचा समारोप आज होत आहे.कालच्या उद्दघाटनाच्या भाषणात पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा असे आवाहन केले होते.या पार्श्वभूमीवर आजच्या सकाळच्या सत्रात जयंत पाटील यानी दिलेली चुकीची कबुली विशेष बोलकी समजली जात आहे.जयंत पाटील या मुद्यावरून आऱंभापासूनच नाराज होते.त्यांनी आज ही नाराजी स्पष्ट शब्दात बोलून दाखविल्याने दुसऱ्या फळीतील नेत्यांना पाठिंब्य्याची भूमिका मान्य नव्हती हे समोर आले आहे.
दरम्यान आपल्या भाषणात छगन भुजबळ यांंंंंनी महाराष्ट्रातील भाजप सरकार अस्थिर कऱण्याचा कोणताही इरादा नाही असं मत व्यक्त केल्याने राष्ट्रवादीने आपली भूमिका बदलली आहे काय अशी चर्चा सुरू झाली आहे.या सर्व मुद्यावर दुपारच्या समारोपाच्या सत्रात शरद पवार काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.आज सकाळी सुप्रिया सुळे यांनी देखील आपली भूमिका मांडली .

LEAVE A REPLY