बैलगाडी स्पर्धा आयोजकांवर गुन्हा दाखल

0
825

अलिबाग तालुक्यातील थळ -चाळमळा येथे बेकायदेशीरपणे बैलगाडी स्पर्धांचे आयोजन केल्या प्रकरणी संयोजकांवर आज अलिबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केंद्र सरकारने बैलगाडी स्पर्धांवरील बंदी उठविली होती.मात्र सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.त्यानुसार महाराष्ट्रातील बैलगाडी स्पर्धा आणि तामिळनाडूतील जल्लीकट्टू या स्पर्धांना बंदी कायम ठेवली होती.असे असतानाही चाळमळा येथे 17 मे रोजी 11 ते 12.30 या वेळात बेकायदेशीरपणे बैलगाडी स्पर्धा आयोजित केली होती.त्यात पंचक्रोशितील हौशी बैलगाडी चालक मोठ्या प्रमाणात सामिल झाले होते.याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर अलिबाग पोलिसांनी प्राणी क्लेश प्रतिबंध अधिनियम 1960चे कलम 11 9( 1) अन्वये कलम 37( 1) (3) -135 नुसार गुन्हा दाखल केला आहे.अशा प्रकारचा जिल्हयातील हा पहिलाच गुन्हा असल्याने अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन कऱणार्यांचे धाबे दणाणले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here