बिहारमध्ये पत्रकारांची हत्त्या

0
693

 

बिहारमधील सिवान येथे हिंदुस्थान या हिंदी वृत्तपत्राचे ब्युरोचीफ राजदेव रंजन यांची शुक्रवारी संध्याकाळी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. पत्रकार रंजन यांच्या हत्येनंतर बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नितीश सरकारवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे.

राजदेव रंजन हे सिवान जिल्ह्यातील रेल्वे स्थानकाजवळ आपल्या गाडीवरून प्रवास करत असताना एका गाडीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. यामध्ये रंजन यांचा मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती मिळते.

गया येथील ‘रोड रेज’ प्रकरण सध्या चर्चेत आहे. याच प्रकरणात हत्येच्या आरोपाखाली आमदाराचा मुलगा रॉकी यादव अटकेत आहे. यावर अधिक प्रकाश टाकत राजदेव रंजन गुरुवारी यांनी बिहारमधील एकूण कायदा आणि सुव्यवस्थे संदर्भात प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारवर टीका केली होती, असे स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

दरम्यान, रंजन यांच्या हत्येनंतर भाजपचे प्रवक्ते शहनवाझ हुसेन यांनी ट्विटवरून शोक व्यक्त केला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे वाराणसीत फिरताहेत आणि बिहारमध्ये लोकशाहीचा चौथास्तंभ धोक्यात आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. तसेच हे जंगलराज नाही, तर महाजंगलराज आहे, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here