सिंधुदुर्ग :ओरोस येथे उभे राहत असलेल्या दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाच्या उर्वरित कामाचे लगेच टेंडर काढून हे काम त्वरित पूर्ण करावे असे आदेश सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिकारयांना दिले आहेत.. त्यामुळे स्मारकाचे काम आता लवकरच मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे..उदय सामंत यांनी काल जांभेकर स्मारकाच्या कामास भेट देऊन समाधान व्यक्त केले.. 4 कोटी 55 लाख रूपये खर्च करून बाळशास्त्री यांच्या जन्मभूमीत भव्य स्मारक आणि पत्रकार उभे राहत आहे.. स्मारकाचे काम पूर्णत्वास येत आहे, रंगरंगोटी ही पूर्ण होत आली आहे.. मात्र शासनाकडून एक कोटी 55 लाखाचा निधी अध्याप येणे आहे या निधीतून सभागृहाचे फर्निचर, रेस्ट हाऊस, साऊंड सिस्टीम, लिफ्ट आदि कामे होणार आहेत. ही बाब परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक आणि जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश देढे यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर उदय सामंत यांनी लगेच उपस्थित अधिकारयांना “निधीची काळजी करू नका, टेंडर काढा, काम लवकर पूर्ण करा” अशा सूचना केल्या.. मराठी पत्रकार परिषद आणि जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने यावेळी पालकमंत्र्यांना स्मारकाचे काम लवकर पूर्ण करण्याबाबत विनंती करणारे निवेदन देण्यात आले.. पालकमंत्री उदय सामंत यांचा परिषद अध्यक्ष गजानन नाईक यांच्या हस्ते शाल घालून सत्कार करण्यात आला.. या प्रसंगी खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर जिल्हा अध्यक्ष सतीश सावंत जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री गणेश जेठे, सचिव उमेश तोरसकर उपाध्यक्ष बाळ खडपकर ,जिल्हा मुख्यालय संघाचे अध्यक्ष संदीप गावडे आणि अन्य पदाधिकारी पत्रकार उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि मराठी पत्रकार परिषद गेली पंचवीस वर्षे स्मारकासाठी प्रयत्न आणि पाठपुरावा करीत आहे..
Outstanding story there. What happened after? Thanks! Katherine Linc Walworth