आपल्या अवतीःभवती असा असंख्य घटना घडत असतात की,सामांन्यांना वाटत असतं या घटनांना व्यापक प्रसिध्दी मिळायला हवी..मात्र अशा बातम्या बर्याचदा माध्यमात दिसत नाहीत.याउलट यात बातमी ती काय असा प्रश्न ज्या बातम्या वाचून वाचकांना पडतो असा बातम्यांचं अस्तित्व वाचकांना बुचकळ्यात पाडत असतं.सेलिब्रेटीजच्या खाजगी आयुष्यात डोकावून दिलेल्या या बातम्या कदाचित टीआरपीसाठी उपयुक्तही असताली पण पत्रकारितेचा उद्देश हा असूच शकत नाही.त्यामुळं आम्ही मुद्दाम बातम्या नसलेल्या बातम्या लोकांना सांगणार आहोत..थोडा वेगळा प्रयत्न —