नायक चित्रपट आठवतो ? प्रस्थापितांच्या विरोधात आवाज उठविला म्हणून नायक शिवाजीचं कायदेशीर घर बुलडोझर लावून पाडलं जातं.शिवाजीरावला रस्त्यावर आणलं जातं.याच कथेचा प्रत्यय नांदेड जिल्हयातील देगलुरमध्ये आला आहे.देगलुरमधील एक तरूण पत्रकार विवेक केरूरकर “सार्वभौम जनता” नावाचं साप्ताहिक काढतात.या साप्ताहिकाचं छोटसं ऑफीसही आहे.जे ऑफीस आहे ते अधिकृत आहे.बांधकामाची परवानगी,कंम्पीलशन रिपोर्ट,आणि घरपट्टी भरल्याच्या पावत्याही केरूरकर यांच्याकडे आहेत.दहा वर्षापासून ते ऑफीस आहे.मात्र काही दिवसापुर्वी केरूरकर यांनी नगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात एक लेखमाला आपल्या साप्ताहिकातून चालविली.एवढेच नव्हे तर मुख्याधिकार्यांची आर्थिक व्यवहाराची चौकशी करावी अशी मागणी पोलीस महासंचालकांची भेट घेऊन केली..त्यानंतर मुख्याधिकार्यांच्या व्यवहाराची,नगरपालिकेने गावात केलेलेया निकृष्ट कामांची चौकशीही सुरू झाली.यामुळे मुख्याधिकार्यांचे पित्त खवळले आणि केरूरकर बाहेरगावी गेलेले असताना अत्यंत बेकायदेशीरपणे त्यांचे ऑफीस बुलडोझर लावून तोडले गेले .या संदर्भात विवेक केरूरकर यांनी मुख्याधिकार्याच्या विरोधात अॅट्रा्रसिटी,आणि ऑफीस तोडल्याबद्दल फिर्याद दाखल केली आहे.मात्र अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.विवेक केरूरकर तसेच नांदेड येथील जिल्हा पत्रकार संघाच्या पदाधिकार्यानी आज पोलिस अधिक्षक तसेच जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन पत्रकार विवेक पाटील यांच्यावर केल्या गेलेल्या अन्यायाबद्दल दाद मागितली आहे.नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश कांबळे यानी या घटनेचा निषेध केला आहे.केवळ बातमी दिल्याने चिडून झालेला हा प्रकार निषेधार्ह आणि माध्यमांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्नाचा भाग असल्याचा आरोप जिल्हा पत्रकार संघाने केला आहे–पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीनेही या प्रकाराचा निषेध केला असून बेकायदेशीरपणे ऑफीस पाडल्याबद्दल मुख्याधिकार्यावर कारवाई करावी अशी मागणीही केली आहे.या संबंधीची तक्रार मुख्यमंत्र्यांकडेही करण्यात आली आहे.