दिवसभराच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आज पाचच्या सुमारास राजापूर बोरिवली  या अपघातग्रस्त गाडीचे अवशेष बाहेर काढण्यात नौदलाच्या जवानांना यश आले.आज सकाळी शोध पथकाने शोध मोहिम हाती घेतल्यानंतर सकाळी साडेनऊच्या सुमारास गाडीचे अवशेष घटनास्थळापासून 200 मीटर अंतरावर असल्याचे दिसून आले.त्यानंतर पाच क्रेन आणि जेसीबीच्या माध्यमातून अनेक अडथळ्यांवर मात करीत सायंकाळी पाचच्या सुमारास गाडीचा सांगाडा बाहेर काढण्यात यश आले आहे.सांगाडयात मृतदेह नसल्याचे स्पष्ट झाले असून आतापर्यंत 27 मृतदेह हाती लागले आहेत तर 15 मृतदेह अजून मिळायचे आहेत

LEAVE A REPLY