वृत्तपत्राच्या प्रत्येक आवृत्तीसाठी रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर यांच्याकडं त्या आवृत्तीची स्वतंत्र नोंदणी आवश्यक असते.त्याचा स्वतंत्र नोंदणी क्रमांक देखील अनिवार्य असतो.तो अंकावर छापणंही बंधनकारक असतं.हे नसेल तर संबंधित आवृत्ती बेकायदा समजली जाते.किमान छोटया आणि मध्यम दैनिकांना तरी हा नियम लागू आहे.देशभरातील सर्वच साखळी वृत्तपत्रांची या अंगानं चौकशी केली तर किती साखळी वृत्तपत्रांच्या स्वतंत्र आवृत्यांकडं नोंदणी प्रमाणपत्र असेल असा प्रश्‍न आहे.दैनिक हिंदुस्थानच्या निमित्तानं हा प्रश्‍न समोर आलाय.
दैनिक हिंदुस्थाननं बिहारच्या मुंगेर येथून आपली स्वतंत्र आवृत्ती सुरू केली.सरकारी जाहिराती देखील मिळविल्या÷आरोप असा केला जातोय की,1 ऑगस्ट 2001 ते 30 जून 2011 या काळात या दैनिकानं 200 कोटी रूपयांच्या जाहिराती छापल्या.त्याची बिलंही वसूल केली.पाटणा आवृत्तीचा नोंदणी क्रमांक मुंगेर आवृत्तीवर छापून अकरा वर्षे या दैनिकानं हा घोटाळा केला असा आरोप केला जातोय.हे प्रकरण केवळ आरोपापुरतेच सीमित राहिलेले नाही.या प्रकरणी गुन्हे दाखल झालेत आणि कोर्टात खटलेही सुरू आहेत.मुंगेर पोलिसांत दाखल झालेल्या या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे आदेश सुप्रिम कोर्टानं 11 जलै 2018 रोजी दिलेत.तत्पुर्वी हिदुस्थानच्या मालक शोभना भारतीया यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात एक अपिल दाखल करून या प्रकरणातील सर्व कायदेशीर कारवाईवर प्रतिबंध करावा अशी विनंती केली होती.त्यानुसार असा प्रतिबंध लावला गेला होता.मात्र सर्वोच्च न्यायालयाने आता हा प्रतिबंध हटविला असल्याने कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे.मुंगेरचे पोलीस अधीक्षक गौरव मंगला यांनी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.दैनिकाच्या मालक शोभना भारतीया,शशी शेखर,अक्कू श्रीवास्तव,विनोद बंधू,अमित चोपडा हे सर्व आरोपी आहेत.हिंदुस्थान मिडिया वेंन्चर्स लिमिटेडच्या चेअरपर्सन शोभना भारतीया यांना पोलिसांनी आपली बाजू मांडण्यासाठी हजर राहण्याचा आदेश दिला आहे.
अकरा वर्षे बिनदिक्कतपणे हा घोटाळा होत असताना बिहार सरकारचे माहिती खाते काय करीत होते हा प्रश्‍न आहे.आपल्याकडंही किती दैनिकांच्या आवृत्तींना स्वतंत्र नोंदणी क्रमाक आहे याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आता पुढे येत आहे.

हिंदुस्थानच्या या घोटाळ्याची बातमी मेनस्ट्रीम मिडियात तर येणं शक्य नाही मात्र ती अनेक संकेत स्थळावर प्रसिध्द झाली आहे.पोलीस पोस्ट,भडास मिडिया आणि अन्य काही पोर्टलवर ही बातमी पहायला मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here