पत्रकार संरक्षण कायदाच
मोडीत काढण्याचा रोहा
पोलिसांचा प्रयत्न

रोहा : प़दीर्घ लढयानंतर महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला असला तरी हल्ला झाल्यानंतर पत्रकारांनी पोलिसात तक़ार देण्यासाठी जाऊच नये असा बंदोबस्त केला जात असल्याचा प्रकार रायगड जिल्ह्यातील रोहा येथे घडला आहे..
काही दिवसांपुर्वी रोहयात एका अल्पवयीन गतीमंद मुलीवर नराधमांनी अत्याचार केले.. स्वाभाविकपणे मानवतेच्या भूमिकेतून शहरातील सर्वच पत्रकारांनी हा विषय लावून धरला.. पत्रकारांच्या या भूमिकेनं शहरातील काही राजकीय धेंडं, आणि पोलीस प्रशासन यांची पोलखोल झाली.. त्यामुळं या दोन्ही शक्ती एकत्र झाल्या.. त्यातील एका शक्तीनं म्हणजे राजकीय धेंडांनी रत्नागिरी टाइमसचे रोहा कार्यालय प्रमुख राजेंद्र जाधव यांना भर बैठकीत मारहाण केली..राजेंद्र जाधव डयुटीवर असताना ही घटना घडली. ८ मार्च रोजी बैठकीचे रिपोर्टिंग करण्यासाठी राजेंद्र जाधव उपस्थित असताना हा प्रकार घडला.. अत्याचार झाल्याच्या बातमीत पुढारी हा शब्द वापरलयाचया रागातून ही मारहाण झाली.. या घटनेनंतर राजेंद्र जाधव रोहा पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेले.. तेथे दुसरी शक्ती म्हणजे पोलीस यंत्रणा पत्रकारांच्या विरोधात सक्रीय झाल्याचं दिसलं.. राजेंद्र जाधव पोलिसात जाताच त्यांची ज्यांच्या विरोधात तक्रार होती त्या हल्लेखोरास पोलिस निरिक्षकांनी बोलावून त्याच्याकडून राजेंद्र जाधव यांच्या विरोधात खंडणीची तक्रार लिहून घेतली आणि राजेंद्र जाधव यांना दम दिला की, तुम्ही तक्रार देणार असाल तर तुमच्या विरोधात खंडणीची तक्रार देखील दाखल करून घेण्यात येईल आणि मग दोघांवरही कारवाई केली जाईल.. या दमबाजीने राजेंद्र जाधव यांना गप्प केले.. त्यांनी तक्रार दिली नाहीच उलट पोलिसांनी पत्रकाराकडून हवं ते लिहून घेतलं.. यावेळी राजेंद्र जाधव यांच्या समवेत असलेले सागरचे छायाचित्रकार विश्वजित लूमण यांनाही धमकावण्यात आले.. म्हणजे गुन्हाच दाखल होऊ दिला नाही.. मग पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाईचा प्रश्नच उरला नाही.. कायदा कसा वाकविला जातो, त्याची कशी मोडतोड केली जाते याचे रोहयातील ही घटना मासलेवाईक उदाहरण आहे..
पोलिसांची ही मनमानी पाहून रायगडमधील सर्व पत्रकारांनी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली एकत्र येत जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या दरबारात कैफियत मांडली.. या घटनेला देखील आता तीन दिवस उलटले आहेत पण संबंधित पोलीस निरीक्षकावर अजून कोणतीच कारवाई झाली नाही.. मात्र हा विषय आता गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दरबारात घेऊन जाण्याचा निर्णय पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी घेतला आहे.. रोहयाच्या संबंधित पोलीस अधिकार्‍यांची बदली करावी अशी मागणी एस.एम.देशमुख यांनी केली आहे…

LEAVE A REPLY