बघा,फ्रान्सच्या माध्यमांनी काय निर्णय घेतलाय…

0
869

गुन्हेगारांचे फोटो पहिल्या पानावर छापून त्यांना हिरो बनविण्याचे प्रयत्न वृत्तपत्रे करतात अशा आरोप नेहमीच केला जातो.त्यात काही अंशी तथ्य देखील आहे.जगभर हे दिसते.मात्र फ्रान्सच्या वृत्तपत्रांनी,आणि वाहिन्याचे संपादक ,मालक,प्रकाशकांनी  आता एक अनुकरणीय निर्णय घेतला आहे.इस्लामिक स्टेट ग्रुपच्या अतिरेक्यांचे फोटो किंवा त्याचं उदात्तीकरण होईल असा मजकूर न छापण्याचा स्तुत्य निर्णय माध्यमांनी घेतला आहे.एवढंच कश्याला त्यांची नावंही वर्तमानपत्रात छापायची नाहीत असं त्यांनी ठरविलं आहे. अतिरेकी हल्लयावर रात्रीच्या टॉक शो मध्ये चर्चाही केली जाणार नाही.फा्रान्समध्ये सातत्यानं होत असलेल्या अतिरेकी हल्ल्यामुळे सारेच त्रस्त असून त्यावर उपाय शोधण्यासाठी वेगवेगळे उपाय योजिले जात आहेत.माध्यमांनी स्वतः पुढाकार घेत हा निर्णय घेतला असल्याने जनतेतून त्याचे स्वागत होत आहे.या निर्णयात फ्रान्समधील वृत्तपत्र  ‘Le Monde’  आणि  टेलिव्हिजन वाहिनी ‘BFM TV’  देखील सामिल आहेत.माध्यमांच्या या भूमिकेबद्दल फा्रन्सच्या संसदेतही चर्चा झाली आहे. ‘Le Monde’  वृत्तपत्राने आज छापलेल्या अग्रलेखात म्हटले आहे की,आम्ही आमच्या वृत्तपत्रात अतिरेक्यांचे फोटो छापणार नाही,फोटो छापून त्यांना हिरो आम्ही करणार नाही .तसेच  ‘BFM TV’ वाहिनीने देखील आम्ही आमच्या चॅनलवरून चेहेरे दाखविणार नाही. या निर्णयात ‘Radio Europe-1’  देखील सहभागी आहे.आपल्याकडील माध्यमं अशी भूमिका कधी घेतील

याची प्रतिक्षा आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here