महिला पत्रकारास विवस्त्र कऱण्याचा प्रयत्न

0
861

मुंबईत एका महिला पत्रकारावर सामुहिक अत्याचार झाल्याची घठना अजून विस्मृतीत गेलेली नसतानाच बंगलोरमधून आलेली बातमी संपूर्ण पत्रकार जगताची तळपायाची आग मस्तकाला घेऊन जाणारी आहे.ही घटना लाच्छानास्पद नव्हे तर पत्रकारिता बिकावू झाली आहे म्हणत बोंबा मारणाऱ्यांना विचार करायला लावणारीही आहे.

घटना बंगोलरची आहे.कर्नाटकचे मंत्री डी के शिवकुमार यांचे स्टींग ऑपरेशन न्यूज -9 आणि टीव्ही-9 च्या पत्रकारांनी करण्याचा प्रयत्न केला.त्यात एक महिला पत्रकारही होती.स्टींग ऑपरेशन सुरू आहे याचा पत्ता जेव्हा मंत्रीमहोदयाला लागला तेव्हा त्याने आपल्या समर्थकांकडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.धारदार अस्त्राचेही वार केले.श्रेयस नावाच्या पत्रकाराशी हे सारे केले गेले.मात्र त्याच्या बरोबर असलेल्या महिला पत्रकाराशी शिवकुमारने जो प्रकार केला तो राजकारणी कोणत्या मानसिकतेचे शिकार झालेले आहेत ते दिसेल.
शिवकुमारे महिला पत्रकाराच्या बटनं हातात धरत आपल्या समर्थक गुंडांना ती बटणं काढायला सांगितली.संबंधित महिला पत्रकाराला आपल्या गुंडांसमोरर विवस्त्र कऱण्याचे मंत्री महोदयाचे मनसुबे होते.ही माहिती महिला पत्रकारानेच काल प्रेस क्लब येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.या साऱ्या घटनाक्रमाचे व्हिडीओ रेकॉर्डिंगही केले गेले असल्याचा दावा त्यांनी केला मात्र सज्जड पुरावा म्हणून वापरता येऊ शकेल असे हा व्हिडीओ आणि कॅमेरा पोलिसांनी जप्त केला आहे.
या घटनेचा कर्नाटकमधील पत्रकारांनी धिक्कार केला असला ते रस्त्यावर उतरले असले तरी या घटनेचा निषेध संपूर्ण देशभर झाला पाहिजे.दुर्दैवाने पत्रकार एक नसल्याने अशा घटना घडत असताना संबंधित पत्रकार एकटे पडतात.काल बंगलोरमध्ये जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेत चॅनलचे संपादक किंवा व्यवस्थापन उपस्थित होते की नाही ते समजू शकले नसले तरी ते नक्कीच उपस्थित नसतील कारण पत्रकारांक डून कामं करून घ्यायाचे आणि ते अडचणीत आले की,त्यांना वाऱ्यावर सोडायचे ही नीती साऱ्याच व्यवस्तापनाकडून अवलंबिली जाते.अशा स्थितीत पत्रकार संघटनांनी पुढे आले पाहिजे त्यासाठी संघटनाही मजबूत आणि एकसंघ असल्यापाहिजेत.
मराठी पत्रकार आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती या घटनेचा तीव्र शब्दात धिक्कार करीत असून महिला पत्रकारांच्या शर्टला हात घालणाऱ्या संंबंधित मंत्र्याला तातडीने घरी पाठवून त्याच्याविरोधात पोलिसांनी कारावाई केली पाहिजे अशी मागणी करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here