प्रेस क्लबची वेबसाईट हॅक

0
808

प्रेस क्लब ऑफ इंडियाची वेबसाईट( www.pressclubofindia.org ) पाकिस्तानी हॅकर्सनी हॅक केली आहे.हॅक केलेल्या या साईटवर भारत आणि भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आपत्तीजनक मजकूर टाकला गेला आहे.
पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या अधिकृत वेबसाईटवर भारतीय तिरंगा फडकताना दाखविला गेल्यानंतर ती साईट हॅक झाल्याचे स्पष्ट झाले होते.याच साईटवर काश्मीर पाकिस्तानला कधीच मिळणार नाही असा मजकूरही पीपल्स पार्टीच्या साईटवर आहे.या घटनेनंतर आम्ही भारताची सरकारी वेबसाईट हॅक कऱण्याचा प्रयत्न केला होता असे टीम साईबर वरियर्स या हॅकर्स ग्रुपने म्हटले आहे.
आपली वेबसाईट हॅक झाल्याचे प्रेस क्लबने एका प्रसिद्दी पत्रकाव्दारे जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here