प्रा. सुरेश पुरी यांना पराडकर पुरस्कार

0
785

वर्धा, – महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्यक अकादमीतर्फे देण्यात येणारा सन 2013 चा पत्रकारितेच्या संदर्भातील राज्यस्‍तरीय बाबूराव विष्‍णू पराडकर पुरस्कार राज्‍याचे सांस्कृातिक कार्यमंत्री संजय देवतळे यांच्या्हस्ते प्रा. सुरेश पुरी यांना प्रदान करण्याात आला. प्रा. पुरी यांना नुकताच महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालयातर्फे हिंदी सेवी सन्मानाने सन्‍मानित करण्‍यात आलेले आहे. 

पुरस्का्र वितरण सोहळा मुंबईतील प्रभादेवीच्‍या रवींद्र नाट्य मंदिरात थाटात पार पडला. या सोहळ्यास अकादमीचे कार्याध्य‍क्ष डॉ. दामोदर खडसे, ज्येष्ठ सदस्‍य आणि अखिल भारतीय हिंदी संस्था‍ संघ दिल्लीचे सचिव डॉ.चंद्रदेव कवडे, गुजराती साहित्य अकादमीचे अध्यक्ष हेमराज शाह, उर्दू अकादमीचे अध्‍यक्ष, महाराष्ट्र भारती पुरस्कृत डॉ. चंद्रकांत पाटील, अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्काराने सन्मानित वेद राही, अकादमीच्या् सदस्य प्रा. अनुया दळवी, पुरस्कार समिती संयोजक अनुराग चतुर्वेदी, निदेशक आशुतोष घोरपडे, संयुक्त् निदेशक विश्वुनाथ साळवी, सत्यनारायण शर्मा, राजेंद्र पटोरिया उपस्थित होते. प्रास्ताविक कार्याध्यक्ष डॉ. दामोदर खडसे यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती दळवी यांनी केले. विश्वसनाथ साळवी यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here