प्रसन्न जोशी यांना पुरस्कार

0
1117

रायगड प्रेस क्लबचा राज्यस्तरीय युवा संपादक पुरस्कार प्रसन्न जोशी यांना जाहीर,जिल्ह्यातील आठ पत्रकारांचा होणार सन्मान ,2एप्रिल रोजी वर्धापन दिन

पनवेल—
रायगड जिल्ह्यातील पत्रकारांची सामाजिक बांधिलकी जपणारी संघटना म्हणून नावलौकिक असलेल्या रायगड प्रेस क्लब या संघटनेचा 13 वा वर्धापन दिन 2एप्रिल 2016 रोजी पनवेल येथे होणार आहे.जिल्ह्यातील सहा पत्रकारांना आणि राज्यातील एका संपादकाला त्यावेळी विशेष पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे.आचार्य अत्रे राज्यस्तरीय युवा संपादक पुरस्कार प्रसिद्ध राजकीय विश्लेषक जय महाराष्ट्र वृत्त वाहिनीचे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी यांना देण्यात येणार आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्या हस्ते आणि मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस एम देशमुख तसेच जेष्ठ पत्रकार डॉ अरुण खोरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगणार आहे,अशी माहिती रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष संतोष पेरणे, वर्धापन दिन सोहळा समितीचे प्रमुख विजय पवार,पनवेल प्रेस क्लबचे अध्यक्ष अनिल भोळे यांनी पनवेल येथे दिली.
जिल्हा प्रेस क्लबचा आचार्य अत्रे राज्यस्तरीय युवा संपादक पुरस्कार प्रसन्न जोशी यांना जाहीर झाला आहे.त्यांना रोख 5000 रुपये आणि सन्मान चिन्ह,मानपत्र देवून सन्मानित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सहा पत्रकारांचा सन्मान करण्यात येणार असून त्यात जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार म्हणून कर्जतचे सुनील भास्कर दांडेकर यांना तर युवा पत्रकार म्हणून संतोष सावंत-लोकसत्ता-पनवेल,अमोल जंगम-लोकमत-म्हसळा,यांची तर सावित्रीबाई फुले महिला पत्रकार पुरस्कार रोहा येथील रत्नागिरी टाइम्सच्या प्रतिनिधी अंजुम शेट्टे,तर उत्कृष्ट छायाचित्रकार म्हणून अलीबाग येथील पुढारीचे रमेश कांबले,आणि स्व.प्रकाश काटदरे निर्भिड पत्रकार पुरस्कार पनवेल टाइम्सचे संपादक गणेश कोळी यांना देण्यात येणार आहे.रायगड प्रेस क्लबच्या वर्धापन दिन कार्यक्रमात जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे युवा पत्रकार पुरस्कार यांचे वितरण करण्यात येणार आहेत.श्रमिक पत्रकार संघाचे युवा पत्रकार पुरस्कार कर्जत येथील कृषीवलचे प्रतिनिधी संजय गायकवाड,आणि माणगाव येथील सागरचे प्रतिनिधी प्रवीण गोरेगावकर यांना जाहीर करण्यात आला आहे.या सर्व पुरस्कार विजेते पत्रकार यांचा रोख रक्कम, सन्मानचिन्ह,देवून गौरविण्यात येणार आहे.
रायगड प्रेस क्लबचा 13 वा वर्धापन दिन पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आला.2एप्रिल 2016 रोजी सकाळी 11 वाजता हा वर्धापन दिन सोहळा होत असून त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता उपस्थित राहणार आहेत.मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष आणि रायगड प्रेस क्लबचे संस्थापक एस एम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमाला जेष्ठ पत्रकार डॉ अरुण खोरे,रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे,माजी खासदार रामशेठ ठाकुर,पनवेलचे आमदार प्रशांत ठाकुर,उरणचे आमदार मनोहर भोईर,माजी आमदार विवेक पाटील,माहिती आणि जनसंपर्क विभागाचे उपसंचालक डॉ गणेश मुळे,यांच्यासह पनवेल पंचायत समितीच्या सभापती चित्रा गायकर,पनवेलच्या नगराध्यक्षा
चारुशीला घरत,शेकापचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिनेश पाटील,कांग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आर सी घरत,आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष जगदीश गायकवाड,
पनवेलचे प्रांत अधिकारी भरत शितोले,तहसीलदार दीपक आकडे,पोलिस अधिकारी सुनील बाजारे,यांच्यासह पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे,तसेच सुरेश सावंत यांची उपस्थिति असणार आहे.मराठी पत्रकार परिषदेचे माजी सरचिटणीस संतोष पवार ,कोषाध्यक्ष मिलिंद अष्टिवकर, रायगड प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष अभय आपटे आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे रायगड जिल्हा निमंत्रक दीपक शिंदे,यांची उपस्थिति असणार आहे.
वर्धापन दिन कार्यक्रमात रायगड प्रेस क्लबच्या लेखणी या स्मरनिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे.तर पनवेल मधील प्रकाशित होणाऱ्या दैनिक वृत्तपत्र यांचे संपादक यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.रायगड प्रेस क्लबचा 13वा वर्धापन सोहळा पनवेल प्रेस क्लबच्या पुढाकाराने आणि प्रमुख नियोजनाखाली होत आहे,अशी माहिती रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष संतोष पेरणे आणि वर्धापन दिन सोहळा समिती प्रमुख विजय पवार यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here