पोलिसांना अडचणीत आणणारी एखादी बातमी प्रसिध्द झाली की पोलिसांचे पित्त खवळते आणि मग ते संबंधित पत्रकाराच्या पाठीशी हात धुवून लागतात.असे प्रसंगाना राज्यातील अनेक पत्रकारांना सामोरं जावं लागलेलं आहे.पत्रकारांना अद्यल घडविताना तर काही वेळा थेट त्यांच्यावर देशद्रोहासारखे गंभीर गुन्हे दाखल करतानाही पोलिसांनी मागे पुढे पाहिलेल नाही.
नंदूरबार येथील तापीकाठ दैनिकाचे संपादक आणि मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष चंद्रशेखऱ बेहेरे यांच्यावरही पोलिसांनी अशाच प्रसंगांला सामोरं जाण्याची वेळ आणली आहे.एकाच गावात मिरवणुकींना दोन वेगळे नियम कसे अशी एक बातमी तापीकाठमध्ये प्रसिध्द झाली आहे.या बातमीमुळे नंदूरबारची पोलिस यंत्रणा कमालीची अडचणीत आली आहे.मग त्याचा राग त्यांनी तापीकाठच्या संपादकांवर काठला असून बातमीची चौकशी करण्यासाठी त्यांना काल रात्री पोलिस ठाण्यात बोलावून घेण्यात आले आणि नंतर त्यांना तेथेच अटक करण्यात आली.त्यांच्या विरोधात 153 कलमाखाली गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.नंदूरबार पोलिसांची ही अरेरावी वृत्तपत्र स्वातंत्र्याचा गळा घोटणारी,लेखन स्वातंत्र्यावर गदा आणणारी असल्याने पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तसेच मराठी पत्रकार परिषद पोलिसांच्या या अरेरावीचा निषेध करीत आहे.