पोलादपूरनजिक पिकअप व्हॅनला अपघात,
4 ठार,14 जखमी,मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
 
पोलादपूर ः रायगड जिल्हयातील पोलादपूरनजिक आडवळेगावाजवळ एका पिकअप व्हॅनला झालेल्या भीषण अपघातात 4 जण जागीच ठार झाले असून अन्य 14 जण जखमी झाले आहेत.जखमींपैकी काहींची प्रकृत्ती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.बुधवारी रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाल्याचे पोलादपूर पोलिसांनी आकाशवाणीला सांगितले.
एका पिकअप व्हॅनमधून पार्टेकोंड येथील 30 जण साखरपुड्याच्या कार्यक्रमास जात असताना एका वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी पलटी होऊन खोल दरीत कोसळली.त्यात 4 जण जागीच ठार झाले आहेत.मृतांमध्ये भिकू तुकाराम मालुसरे,पांडुरंग धोंडू बिरामते आणि अनिकेत अनंत सकपाळ यांचा समावेश आहे.जखमींपैकी काहींना पोलादपूरच्या शासकीय रूग्णालायत दाखळ करण्यात आले आहे.रात्री गर्द काळोख असल्याने दरीत कोसळलेल्यांना बाहेर काढताना अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here