पेन्शऩचा विषय मार्गी लावणार-

0
649

पत्रकार पेन्शऩचा विषय याच अधिवेशनात मार्गी लावणार- मुख्यमंत्री

मुंबईः पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या 15 मार्च रोजी होणार्‍या एसएमएस भडिमार आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी आज पत्रकार पेन्शनचा विषय याच अधिवेशनात मार्गी लावण्याची घोषणा केली असल्याने गेली वीस वर्षे प्रलंबित असलेला हा विषय आता मार्गी लागेल अशी शक्यता आहे.पेन्शनची रक्कम किती असावी हे मात्र मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले नसले तरी हा विषय आता मार्गी लागत आहे ही बाब स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक तथा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
मंत्रालयात आज पत्रकाराशी मिड द प्रेस कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी संरक्षण कायद्याचा मसुदा देखील तयार असून त्याबाबतही सरकार सकारात्मक आहे असे मत व्यक्त केले आहे.पन्नास वर्षे वयाच्या पत्रकारांना ज्येष्ठ पत्रकार म्हणून अधिस्वीकृती मिळाली पाहिजे ही परिषदेची भूमिका आहे.त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,या बाबतचा प्रस्ताव सामांन्य प्रशासन विभागाकडून येताच त्यालाही मंजुरी दिली जाईल.त्यामुळे पत्रकारांच्या तीनही मुख्य मागण्या आता मार्गी लागतील अशी शक्यता आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि मराठी पत्रकार परिषद गेली अनेक वर्षे या प्रश्‍नावर लढा देत आहे.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here