पेण पोलिसांची चौकशी सुरू

0
739
बहुचर्चित शीना बोरा हत्याप्रकरणी रायगड पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेची आयजी दर्जाच्याअधिकार्‍याकडून   चौकशी सुरू असल्याची माहिती रायगडचे पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांनी आज सायंकाळी अलिबाग येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
सुवेझ हक यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की,23 मे 2012 रोजी गागोदे खिंडीत जळालेल्या अवस्थेत एक मानवी  सांगडा सापडल्याची माहिती एका व्यक्तीने पेण पोलिसांना दिली होती.त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळास भेट देऊन पंचनामा केला मात्र त्यानंतरही पोलिसांनी अपघाती मृत्यू अथवा खुनाचा गुन्हा दाखल केला नव्हता.त्यानंतर जेजे हॉस्पिटलमध्ये मृतदेहाचे अवशेष पाठविले मात्र अजून हॉस्पिटलने रिपोर्ट पाठविला नाही किंवा पेण पोलिसांनी त्याचा पाठपुरावा केला नाही.या संपुर्ण प्रकऱणाची आता चौकशी सुरू करण्यात आल्याचे पोलिस अधिक्षकांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here