पेणमध्ये पोलिसांची अरेरावी: शंभरावर पत्रकारांना अटक,
आंदोलन यशस्वी झाल्याचा एस.एम.देशमुख यांचा दावा

पेण-मुबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे बंद पडलेले काम त्वरित सुरू करावे यामागणीसाठी आज पेण येथे एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाल काोकणातील पत्रकारांनी रास्ता रोको आंदोलन केले.गांधी स्मारकापासून निधालेला मोचार्र् महामर्गाच्या जवळ येताच पोलिसांनी बळाचा वापर करून तो अडविला तेव्हा पत्रकारांनी महामर्गाकडून पेण शहरात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरच ठिय्या मारून तो रास्ता अडविला.त्यानंतर उपस्थित असलेल्या शेकडो पोलिसांनी पत्रकारांना उचलून गाड्यांमध्ये टाकत ताब्यात घेतले .एस.एम.देशमुख यांच्यासह जवळपास 100 पत्रकारांना पोलिसांनी अटक करून पोलिस ठाण्यात नेले.नंतर त्यांची सुटका करण्यात आली.लोकहिताच्या मागणीसाठी चालविलेले पत्रकारांचे आंदोलन पोलिसांनी बळाचा वापर करून चिरडण्याचा प्रय़त्न केल्याबद्दल आंदोलकांनी पोलिसांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

सकाळी पेणच्या गांधी स्मारकापासून शातंतेच्या मार्गाने मोर्चा पेणच्या मुख्य बाजार पेठेतून महामार्गाकडे निघाला.यावेळी पत्रकार आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोर्चात सहभागी झाले होते.चौपदरीकरणाचे काम झालेच पाहिजे,पत्रकारांच्या एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देत पत्रकार शांततेच्या मार्गाने महामार्गाकडे निघाले होते.मात्र हा मोर्चा महामार्गावर जाण्यापुर्वीच पोलिसांनी अडविला.तेव्हा पत्रकारांनी मोर्चा जेथे अडविला तेथेच ठिय्या मांडला आणि जवळपास पंधरा मिनिटे पेण शहरात जाणारा मुख्य रस्ता अडवून धरला.यावेळी पोलिस आणि पत्रकारंामध्ये मोठी हुज्जत झाली.अखेर अनेक पत्रकारांना पोलिसांनी उचलूनच गाडीत टाकले.
महामार्गाचे काम सुरू करावे यामागणीसाठी कोकणातील पत्रकार गेली सहा वर्षे शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहेत. जनहितासाठी सुरू असलेल्या आंदोलनास नेहमीच पोलिसांचे सहकार्य मिळाले.पण आज पोलिसांची अरेरावी दिसुन आली.पोलिस जसे ठेकेदार कंपन्यांसाठी काम करीत होते अशा पध्दतीने वागत होते.नंतर पत्रकारासमोर बोलताना एस.एम.देशमुख यांनी आंदोलनाचा आमचा उद्धेश साध्य झाल्याने आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. महामार्गाचे काम 1 जानेवारीपर्यत सुरू झाले नाही तर अधिक तीव्र आंदोलन केले जाईल आणि या आंदोलनात महाराष्ट्रातील पत्रकार सहभागी होतील असे जाहीर केले.आंदोलनाची पुढील दिशा 11 जानेवारी रोजी रेवदंडा येथे होणा़ऱ्या सभेत नक्की केली जाणार आहे.या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचीही भेट घेतली जाणार आहे.
आजच्या मोर्चात मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष किरण नाईक,सरचिटणीस संतोष पवार,उपाध्यक्ष सुभाष भारव्दाज,प्रसिध्दी प्रमुख श्रीराम कुमठेकर ,कोकण विभागीय चिटणीस मिलिंद अष्टीवकर,रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पवार,माजी अध्यक्ष अभय आपटे,कार्यध्यक्ष संतोष पेऱणे,सरचिटणीस भारत रांजनकर.पेण प्रेस कल्बचे अध्यक्ष दत्ता म्हात्रे,विजय मोकल,देवा पेरवी पुणे पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुनील वाळुंज यांच्यासह शंभरावर पत्रकार सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here