आंदोलनाचे यश

0
776

नागपूर – मुंबई-गोवा महामार्गाच्या रूदीकरणाचे बंद पडलेले काम त्वरित सुरू करावे या मागणीसाठी कोकणातील पत्रकार काल रायगड जिल्हयातील पेण येथे रास्ता रोको करीत असतानाच पत्रकाराच्या आंदोलनाकडे आमदार हुस्नबानू खलिफे यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधले.दोन वर्षांपासून सुरू असलेले रास्ता रूदीकरणाचे काम गेले दीड महिना बंद असल्याची बाब आमदार खलिफे यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिली.त्यावर उत्तर देताना चद्रकांत पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी यासंदर्भात ऩुकतीच बैठक झाली असल्याचे सांगितले.हे काम त्वरित सुरू व्हावे यासाठी आणखी एक बैठक घेण्यात येणार असल्याची माहितीही चंद्रकांत पाटील यांनी दिली.या महामार्गाचे काम लवरकर मार्गी लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान कोकणातील पत्रकार लवकरच बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत.आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी रायगड प्रेस क्लबची बैठक 11 जानेवारी रोजी अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथे होणार असल्याची माहिती अध्यक्ष विजय पवार यांन ीदिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here