” बाबा” चालले ?

0
599

टाइम्स ऑफ़ इंडियानं बातमी दिलीय,मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण चालले म्हणून.लोकसभा निवडणुकीत कॉग्रेस-राष्ट्रवादीचं झालेलं पानिपत आणि राज्यातील कॉग्रेस पक्षाचे आमदार तसचे राष्ट्रवादी पक्षाचा चव्हाण यांना असलेला विरोध लक्षमत घेऊन कॉग्रेस हायकमांड राज्यातील नेर्तृत्व बदलू शकते असे टाइम्सचे म्हणणे आहे.चव्हाण यांच्या जागी राधाकृष्ण विखे पाटील,हर्षवर्धन पाटील,बाळासाहेब थोरात यांच्या नावांबरोबरच माजी केंर्दीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाचाही विचार केला जाऊ शकतो असेही बातमीत म्हटले आहे.विधानसभा निवडणुका ऑक्टोबरमध्ये होत आहेत तत्पुर्वी हा निर्णय घेतला जाऊ शकतो असे बातमीत स्पष्ट कऱण्यात आलं आहे

पृथ्वीराज चव्हाण यांना बदलले गेले तर त्यांच्या जागी कोणाला आणले जाणार याबाबतची जी नावं टाइम्सनं दिली आहेत त्यात नारायण राणे यांचे नाव नाही हे विशेष.नारायण राणे भाजपमध्ये जाणार असल्याची जी चर्चा सुरू होती त्यामुळे त्यांच्या पक्षनिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला त्यामुळे त्यांच्या नावावर श्रेष्टींनी फुली मारली असावी असे दिसते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here