पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

0
957
राष्ट्रीय पत्रकार पुरस्कारासाठी प्रवेशिका
पाठविण्याचे आवाहनशनिवार, ०६ ऑगस्ट, २०१६
 
मुंबई : प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पत्रकारितेच्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या पत्रकार, छायाचित्रकार आणि मुक्त पत्रकार यांच्यासाठी राष्ट्रीय पत्रकार पुरस्कार देण्यात येणार आहेत. यासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन प्रेस कौन्सिल ऑफ इंडियातर्फे करण्यात आले आहे.
 
राष्ट्रीय प्रेस दिनी 16 नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या समारंभामध्ये या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल. पुरस्कारासाठीच्या प्रवेशिका www.presscouncil.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, असे प्रेस कौन्सिल ऑफ इंडियातर्फे कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here