पुणे: पोलिसांकडून पत्रकारांना मारहाण होण्याचे प्रकार थांबायचं नाव घेत नाहीत.काल पुण्यानजिक मांजरी येथे पुन्हा एका पत्रकाराला आपलं काम करताना पोलिसांनी मारहाण केली.एका आंदोलनाची बातमी कव्हर करताना हा प्रकार घडला.
मांझरी येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसत्ीगृहातील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलंय.लोकसत्ताचे पत्रकार निलेश भुकेले तेथे उपस्थित होते.आंदोलनाचं आणि तेथील घडामोडीचं रेकॉर्डिंग करीत असताना वानवडी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश मोरे यांनी भुकेले यांना ‘तू रेकॉर्डिंग का करतोस’? अशी दमबाजी केली.’मी पत्रकार आहेे’ असं सांगत भुकेले यांनी आपले ओळखपत्र देखील दाखविले तरीही ‘रेकॉर्डिंग डिलिट कर’ असा आग्रह त्यांनी धरला.मात्र त्यास भुकेले यांनी नकार दिल्यानंतर मोरे यांनी त्यांना मारहाण करीत एखादया गुन्हेगारांसारखे गाडीत कोंबून हडपसर ठाण्यात नेले.तेथे भुकेले यांना धमकावून त्यांच्याकडून माफीनामा लिहून घेतला गेला.2017 मधील पत्रकारावरचा हा 55 वा हल्ला आहे.
या घटनेचा पुणे जिल्हा पत्रकार संघ तसेच पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने निषेध केला असून मुख्यमंत्र्यांना याबाबतचे निवेदन पाठविण्यात आले आहे.शिवसेना आमदार डॉ.निलम गोर्हे यांनी देखील पोलीस आयुक्त रश्मी शुल्का यांना निवेदन देऊन या प्रकराणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.ः