पनवेल येथील महिला पत्रकार चेतना वावेकर याच्यावर झालेल्या हल्ल्याने महाराष्टा्रातील मिडिया जगत संतप्त असतानाच काल रात्री पुणे येथील पुण्यनगरीच्या पत्रकार अश्विनी सातव-डोके यांच्या घरावर काही समाजकंटकांनी हल्ला क रून दङशत निर्माण करण्याचा प्रय़त्न केला आहे.या हल्ल्यात अश्विनीच्या आई आणि 75 वर्षांच्या आजींना धक्काबुक्की झाल्याचे सांगितले जाते.हल्ला झाला तेव्हा या दोघीच घरात होत्या.या प्रकरणी तक्रारीत आरोपींची नावे दिली असली तरी अद्याप कोणाला अटक झालेली नाही.घरगुती वादातून हा हल्ला झाला असला तरी सभ्य समाजात अशा हल्ल्यानंा स्थान नसल्याने पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती या घटनेचा निषेध करीत असून आरोपीवर तातडीने कारवाई कऱण्याची मागणी करीत आहे.