पुणे श्रमिक पत्रकार संघ 75 व्या वर्षात 

0
4671
मराठी पत्रकार परिषदेची स्थापना 3 डिसेंबर 1939 रोजी मुंबईत झाली.परिषदेचा अमृत महोत्सव नुकताच संपन्न झाला.त्यानिमित्त राज्यभर पत्रकारांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन कऱण्यात आलं होतं.परिषदेच्या स्थापनेनंतर बरोबर एक वर्षांनी पुण्यात श्रमिक पत्रकार संघ स्थापन झाला.येत्या 17 तारखेला  श्रमिक पत्रकार संघ अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे.विशेष म्हणजे परिषदेची स्थापना ज्या मान्यवर संपादकांनी केली होती.या सर्वानी  पुण्यात श्रमिक पत्रकार संघाच्या स्थापनेतही पुढाकार घेतला होता.केसरीचे संपादक ज.स.करंदीकर हे श्रमिकचे ंसंस्थापक अध्यक्ष होत.ते परिषदेचेही अध्यक्ष होते.1942मध्ये मुंबईत झालेल्या परिषदेच्या तिसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविलं होतं.दा.वि.गोखले हे परिषदेच्या सोलापूर येथे झालेल्या पाचव्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते.काकासाहेब लिमये हे तर परिषदेचे संस्थापकच होते.लोकशक्तीचे संपादक शं.द.जावडेकर हे श्रमिकच्या संस्थापकांपैकी एक आहेत.हे सर्व पत्रकार परिषदेचेही पदाधिकारी होते.कोणत्याही संघटनेच्या आयुष्यात तिचा अमृत महोत्सव ही महत्वाची घटना असते.श्रमिकच्या दृष्टीनंही हा महत्वाचा प्रसंग असणार आहे.आपल्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं श्रमिकनं स्नेहमेळाव्याचं आयोजन केलं आहे.येत्या 17 डिसेंबर रोजी श्रमिकच्या पुणे येथील पत्रकार भवनात हा कार्यक्रम होत आहे.सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन श्रमिकचे अध्यक्ष महेंद्र बडदे आणि सरचिटणीस सुनीत भावे यांनी केले आहे.
पुणे श्रमिक पत्रकार संघ राज्यातील क्रीयाशील पत्रकार संघटनांपैकी एक आहे.पुणे शहरातील 600 पत्रकार श्रमिकचे सदस्य असून संघाच्यावतीनं विविध उपक्रम राबविले जात आहेत.
पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, मराठी पत्रकार परिषद तसेच पुणे जिल्हा पत्रकार संघाच्यावतीनं  श्रमिक पत्रकार संघास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here