पुणे जिल्हा पत्रकार संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू

0
843

पुणे जिल्हा पत्रकार संघाची व्दैवार्षिक निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे.हा पत्रकार संघ मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असून परिषदेच्या घटनेबरहुकूम ही प्रक्रिया पार पडत आहे.जिल्हा पत्रकार संघाच्या इतिहासात प्रथम पोस्टल बॅलेटव्दारे ही प्रक्रिया पार पडत आहे.म्हणजे जे पत्रकार जिल्हा संघाचे सदस्य आहेत त्यांना निवडणुकीसाठी मतदान घर बसल्या करता येणार आहे.उमेदवारी अर्ज दाखल कऱण्याचा आज शेवटचा दिवस आहे.अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ठ झाल्यानंतर जे उमेदवार मैदानात असतील त्यांच्या नावाच्या पत्रिका प्रत्येक मतदाराने पत्रकार संघाकडे नोंदविलेल्या पत्यावर पोस्टाने पाठविल्या जातील.मतपत्रिकेवर मतदान करून मतदारांनी त्या परत पोस्टात टाकायच्या.त्या ठराविक तारखेस परत जिल्हा पत्रकार संघाच्या निवडणूक कार्यालयात पोहोचायला हव्यात.त्यानंतर आलेल्या मतपत्रिकांची मतमोजणी होईल आणि निकाल जाहीर केला जाईल.कार्याध्यक्ष,उपाध्यक्ष,सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष अशा चार पदांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे.पूर्ण लोकशाही आणि अत्यंत पारदर्शक पध्दतीनं पार पडत असलेल्या या निवडणूक प्रक्रियेत पत्रकारांनी सहभागी व्हावे अशी विनंती आहे.अनेक पत्रकार संघटनांच्या निवडणुकाच होत नाहीत.या पार्श्‍वभूमीवर पुणे जिल्हा पत्रकार संघाचं खास अभिनंदन करावं लागेल.पुणे जिल्हा पत्रकार संघाचं अनुकरण अन्य जिल्हा संघानंही करण्याची गरज आहे.निवडनून येणाऱे पदाधिकारी दोन वर्षांसाठीच असतील.त्यांची मुदत 31 ऑगस्ट 2017 पर्यत असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here