टीव्ही-9 आणि एबीएन आंध्र ज्योती या वाहिन्यांवर तेलंगणात घालण्यात आलेली बंदी,आणि मुख्यंत्री के.चंद्रशेखर राव यांनी माध्यमांना जमिनीत गाडण्याच्या दिलेल्या धमकीचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने तीव्र शब्दात धिक्कार केला आहे.
तेलंगणाची निर्मिती झाल्यानंतर काही दिवसातच जुलैमध्ये दोन्ही वाहिन्यांना राज्यात बंदी घालण्यात आली होती.माध्यमांची मुस्कटदाबी कऱण्याची ही कृती अभिव्यक्ती स्वातंत्र्यांची गळचेपी करणारी असून ती घटनेच्या 19 (1) ( ) कलमांचाही भंग करणारी आहे.शिवाय प्रेक्षकांचा टीव्ही पाङण्याच्या अधिकारावरही गदा आणणारी आहे.त्यामुळे केंद्र सरकार आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडियानं या प्रकरणाची दखल घेऊन राज्य सरकारवर कारवाई करावी अशी मागणीही पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील काही पत्रकारांना अंडरवर्ल्ड करून धमक्या दिल्या जात असून त्यांच्या हत्येच्या सुपाऱ्याही दिल्या जात आहेत हे प्रकारही चिंताजनक असून राज्य सरकारने पत्रकारांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करावी अशी मागणीही समितीचे निमंत्रक एस.एम,देशमुख यांनी केली आहे.विविध घटकांकडून माध्यमांचा आवाज बंद करण्याच्या होत असलेल्या प्रयत्नांबद्दलही देशमुख यांनी चिंता व्यक्त क ेली आहे.