पत्रकार महासंघाचे माजी अध्यक्ष राजकुमार गायकवाड यांच्यावर पाथरी येथील एका विधीतज्ञासह त्याच्या भावाने कुर्‍हाडीने प्राणघातक हल्ला केला आहे.याबाबत अधिक माहीती अशी की पत्रकार गायकवाड हे एका कार्यक्रमाहुन पाथरी येथे येत असताना पाथरी न्यायालयाच्या इमारतीसमोर खराब रसत्यामुळे पडले होते याबाबत वृत्तसंकलन करण्यासाठी L&T या कंपनीच्या कार्यालयात गेले असता कार्यालयात का जातो म्हणून पाथरीमधील विधिज्ञ व त्यांचा भावाने   कुर्‍हाडीने डोक्यात जबर मारहाण करत जीवे मारन्याची धमकी दिली आहे.या घडलेल्या घटनेमुळे आता विधिज्ञाना देखील कंपनीकडून महसुल मिळत आहे की काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.पाथरी पोलिसात आरोपी विरुध्द भा.द.वी.नुसार ३०७,५०४,३४ च्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पाथरी पोलीस करत आहेत.गायकवाड यांच्या डोक्याला गंभीर दूखापत झाली असून त्यांना पुढील उपचारार्थ परभणीला पाठवण्यात आले आहे.या घटनेचा पत्रकार संघटनेकडून निषेध करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here