पाकमध्ये न्यूज चॅनलवर हल्ला

0
1393
  • इस्लामाबाद, दि. 23 – पाकिस्तानमधील एका खासगी न्यूज चॅनेलमध्ये घुसून हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. एआरवाय न्यूज चॅनेलवर करण्यात आलेल्या या हिंसक हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट (एमक्यूएम) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे. कव्हरेज करताना पक्षपातीपणा केला जात असल्याने हा हल्ला केला गेला असल्याचं वृत्त स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलं आहे.
     ‘ एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते शस्त्र घेऊन कार्यालयात घुसले. सुरक्षारक्षकांकडून शस्त्र काढून घेतली, आणि सर्व कर्मचा-यांशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. तब्ब्ल एक तास सुरु असलेल्या या हिंसक हल्ल्यात संपत्तीचं मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलं. हजाराहून जास्त कर्मचारी ज्यामध्ये महिलांचादेखील समावेश होता त्यांना ओलीस ठेवण्यात आलं होतं अशी माहिती चॅनेलकडून देण्यात आली आहे.
  •  मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट (एमक्यूएम) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर प्रत्युत्तर देताना हवेत गोळीबार केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट (एमक्यूएम) पक्षाचे वरिष्ठ नेते सय्यग अली रझा अबीदी यांनी मात्र हा पक्षाविरोधात रचला गेलेला कट असल्याचा आरोप केला आहे. ‘एमक्यूएम गेली तीन वर्ष अहिंसकपणे निदर्शन करत आहे’, असा दावा त्यांनी केला आहे.

    रुग्णालयात जखमींना भरती करण्यात आले तेव्हा त्यातील एकाचा मृत्यू झालेला होता’, अशी माहिती डॉक्टर सीमीन यांनी दिली आहे.

  • ऑनलाइन लोकमत

Your Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here