एस.एम.देशमुख

 ————————-

 रद पवारांच्या राष्ट्रवादीनं गेल्या दोन दिवसापासून जे भुईनळे फोटायला सुरूवात केली आहे त्याचा “मतलब” काय असू शकतो?ही खेळी केवळ शरद पवारांची आहे की,शिवसेनेवर दबाव आणण्यासाठी नितीन गडकरी आणि शरद पवार यांची ही संयुक्त “मोहिम”  आहे याबद्दल सध्या राज्यभर संशयाचं वातावरण  आहे.संयुक्त मोहिमेचा संशय यासाठी की,शरद पवारांपेक्षा या मोहिमेचा लाभ शिवसेनेवर दबाव आणण्यासाठी भाजपलाच होताना दिसतोय.संशय असाही आहे की,या नाट्याची निर्मिती देखील निकालाच्या अगोदरच झालेली असावी. कारण  निकाल जाहीर व्हायच्याआधीच   प्रफुल्ल पटेल यांनी टिट्व करून ” राज्यातील सत्तास्थापनेत  राष्ट्रवादी महत्वाची भूमिका बजावणार असल्याचं ” पिल्लू सोडत  राष्ट्रवादीच्या कादरखानी डोक्यात काही तरी षडयंत्र  रचलं जात आहे याची जाणीव  करून दिली होती.खरं तर राज्यातील जनतेनं ज्या पक्षाला उचलून चौथ्या स्थानावर भिरकावलं होतं , ज्या पक्षाची भूमिकाच मतदारांनी संपुष्टात आणली होती,त्यापक्षानं भूमिकेच्या गप्पा मारण्याऐवझी ं जनतेचा कौल मान्य करून  आत्मपरीक्षण करायला हवं होतं, तेवढा समंजसपणा किंवा राजकीय परिपक्वता राष्ट्रवादीचे नेते दाखविताना दिसत नाहीत.उलट वेगवेगळ्या उचापती करून आपण   सत्तेचा ऑक्शीजन मिळाल्याशिवाय जगूच शकत नाही हेच जगाला  दाखवून देत आहेत.राजकारणात अनेक मुखंडांना  सत्ता हे सेवेचं नव्हे तर संपत्ती जमविण्याचं साधन वाटतं.सत्तेतून बेकायदा मार्गानं संपत्ती कमवायची आणि अनैतिक मार्गानं कमविलेल्या  काळ्या पैश्याला संरक्षण मिळविण्यासाठी पुन्हा सत्तेसाठी मांडवल्या करायच्या हा अनेकांचा  उद्योग असतो. राष्ट्रवादी तर अशा उद्योगात माहिर आहे.राष्ट्रवादीला आज  सत्तेची किमान दोन कारणांसाठी गरज आहे.एक तर पाच वर्षे सत्तेच्या बाहेर राहायचं तर पक्ष अभंग ठेवण्याचं आव्हान   आहे.सत्तेचं चॉकलेट आत्ताच आपल्या नेत्यांना दिलं नाही तर अर्धे लढाई सोडून पळाले अर्धे आता पळतील अशी भीती राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना वाटते.त्यामुळे नैतिक-अनैतिक तेचा बाऊ न करता पक्ष टिकविण्यासाठी जे जे करता येईल ते ते  कऱण्याची नेत्यांची तयारी दिसते आहेे. ही फूट पडू द्यायची नसेल  आणि अनेक नेत्यांची संभाव्य तुरूंगवारी टाळायची असेल तर सत्तेची जवळीक साधनं आवश्यक आहे हे पवारांनी ओळखलं आणि सर्व निकाल लागण्यापुर्वीच  त्यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर क रून टाकला.यातून पवारांनी दोन उद्देश साध्य केले.पहिला म्हणजे आपण सत्तेत जात नसलो तरी सत्तेच्या वर्तुळात जात आहोत किंवा जाऊ शकतोे याचा दिलासा आपल्या नेत्यांना देण्याचा प्रय़त्न केला.बाहेरून पाठिंब्याचं निमित्त करीत राज्य सरकारच्या चाव्या आपल्या हाती ठेवन्यची   पवारांची योजना आहे. पवारांचा दुसरा उद्देश भाजप आणि शिवसेनेच्या अगोदरच ताणलेल्या संबंधात बिब्बा टाकण्याचाही आहे.ही राजकीय खेळी खेळताना लगेच आपण म्हणतो तसे होईल किंवा ,भाजपवाले लगेच पाठिंबा  स्वीकारतील असं ह नाही याची देखील पवारांना कल्पना होती.कारण भाजपसाठी ते तेवढं सोपंही नाही हे ही त्यांना ठाऊक होतं.पण सं़शयाचं वातावरण निर्माण करून काही लाभ जर पदरात पाडून घेता येत असेल तर प्रय़त्न करायला काय हरकत आहे ? असाही एक विचार या मागे असू  शकतो  .मात्र शरद पवारांच्या भूमिकावर लगेच कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त कऱणं देखील भाजपसाठी गैरसोयीचं असल्यानं त्यावर भाजपनं हो किंवा नाही अशी कोणतीच  प्रत्रकिया आज संध्याकाळपर्यत तरी दिलेली नव्हती.भाजपच्या या मौनामागंही दोन उद्देश आहेत.पहिला म्हणजे शरद पवारांच्या वक्तव्याची राज्यात काय प्रतिक्रिया उमटते याची चाचपणी करायची आणि दुसरा उद्देश म्हणजे पवारांनी पुडी सोडलीच आहे तर गप्प राहून ति चा शिवसेनेवर दबाव आणण्यासाठी उपयोग करायचा.”पवारांनी बिनशर्त पाठिबा द्यायची तयारी दाखविली आहे तुम्हीही तसाच बिनशर्त पाठिंबा द्या” अशी सूचना काही भाजप नेत्यांनी केली आहे ती पवारांच्या भूमिकेमुळेच. म्हणजे पवारांच्या वक्तव्याचा त्यांच्या पक्षाला फारसा फायदा झाला नसला तरी भाजपला शिवसेनेवर दबाव वाढविण्यासाठी नक्कीच प फायदा झालेला आहे.म्हणूनच अनेकांना असं वाटतंय की,हा प्लान गडकरी आणि पवारांनी एकत्रितपणे ठरविलेला असावा.

दुसरा बाण 

बाहेरून पाठिंब्याचं रॅकेट फुस्स झाल्यानंतर शऱद पवार यांनी आज पुऩ्हा एक फटाका फोडला. “शिवसेनेला पाठिबा देण्याबाबत कॉग्रेस नेत्यांचा फोन आला होता” असं सांगून त्यांनी कॉग्रसला ी अडचणीत आणण्याचा  प्रय़त्न केला आहे.हा फटाका फोडताना,फोन केव्हा आला,निकाल लागल्यावर आला की,निकालाच्या अगोदरच आला, कोणता कॉग्रेस नेता पवारांशी बोलला हे त्यांनी स्पष्ट केलेलं  नाही.हे सांगणं त्यांच्या राजकारणासाठी सोयीचंही  नव्हतं.म्हणूनच “तीन पक्ष एकत्र आले तरी तकलादू बहुमत होतंय,त्यामुळं स्थिर सरकार देता येणार नाही” असं सांगून आपण कॉग्रेसची योजना नाकारली असंही त्यांनी स्पष्ट केलंय.पवारांच्या वक्तव्यावरून असं दिसतंय की, कॉग्रेसच्या कथित  योजनेला पवारांचा  तात्विक किंवा वैचारिक पातळीवरचा विरोध नव्हताच.निर्विवाद बहुमत होत नाही म्हणून म्हणजे केवळ आकडे जमत नाहीत म्हणून विरोध होता.पण समजा तीन पक्ष एकत्र येऊन जर स्थिर सरकार देता आले असते तर कॉग्रेसची योजना पवारांना मान्य होती असा याचा अ र्थ होतो.मुद्दा इ थंच संपत नाही.कॉग्रेसची अशी काही योजना होती तर मग राष्ट्रवादीने बिनशर्त पाठिंबा जाहीर करतानाच  हे  बिंग का फोडले नाही,? ,ते  एक दिवस उशिरा का ज गाला सांगितली?. बिनशर्त पाठिंबा जाहीर करण्याची तरी एवढी घाई का केली? असे ़अनेक प्रश्न पुढे येतात.पवार काका -पुतण्याच्या या वक्तव्यावर कॉग्रेसनं कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.ती देण्याचंीही गरज नाही.काऱण ज्या हिदुत्ववादी पक्षांना कॉग्रेस जातीयवादी,धर्मान्ध,परंपरावादी समजते अशा  कोणत्याही पक्षांना कॉग्रेसनं कधीही  उघड पाठिंबा दिल्याचं उदाहरण नाही.त्यामुळं राष्ट्रवादीचे नेते काहीही बडबडले तरी त्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. कॉग्रेसलाही याची कल्पना असल्यानेच ते पवारांच्या वक्तव्याला अनुल्लेखानं मारत आहेत.गरजेनुसार शाहू,फुले,आंबेडकरांच्या नावांचा वापर करायचा,ती संपली की,या महापुरूषांचं नावही ओठावर येऊ द्यायचं नाही ही कॉग्रेसची नव्हे तर राष्ट्रवादीची जुनी नीती आहे.आणीबाणीनंतर महाराष्ट्रात जो  पुलोदचा प्रयोग झाला त्यात जनसंघ होता.त्याचे नेते शरद पवार होते.नंतरही अटलबिहारी यांच्या काळातही सत्तेची उब पवारांनी  चाखलेली आहे.त्यामुळं त्यांना काहीच वर्ज्य नाही.शऱद पवार वारंवार सांगत असतात की, “राजकारणात कोणालाच अस्पृश्य मानून चालत नाही”.त्यांचा हा सत्तेसाठीचा सोयीचा समाजवाद वारंवार महाराष्ट्रानं अनुभवलेला आहे.कॉग्रेसनं मात्र सत्तेसाठी अशा कोलांटउड्या मारलेल्या नसल्यानं शरद पवार सांगतात त्यावर कोणी विश्वास ठेवला नाही किंवा ठेवणारही नाही.पराभवानं अगोदरच कॉग्रेस एवढी गलितगात्र झाली आहे की,अशा ़अनैतिक मार्गानं सत्तेत वाटेकरी होण्याची योजना आखण्याएवढंही त्राण या पक्षात शिल्लक नाही हे वास्तव आहे.मात्र अगोदरच अडचणीत असलेल्या कॉग्रेससमोरील अडचणीत भर टाकण्यासाठी पवारांचे संशयकल्लोळाचे खेळ सुरू आहेत. कॉग्रेसबद्दल नकारात्मक भावना निर्माण़ करायची आणि आपल्या सत्तेच्या जवळकीच्या प्रय़त्नाकडून जनतेचं लक्ष अन्यत्र वेधायचे हा पवारांचा डाव आहे.शिवाय सत्तेसाठी केवळ आम्हीच नव्हे तर कॉग्रेसही वाट्टेल त्या तडजोडी करायला सज्ज असल्याचा आभास निर्माण करण्याचाही यामागे डाव असू शकतो.

.खरं तर ज्या पक्षाला जनतेनं साफ नाकारलंय अशा पक्षांनी शांतपणे,तेवढ्याच समर्थपणे विरोधी पक्षाची भूमिका पार पाडवी आणि ज्यांना जनतेनं कौल दिलाय त्यांना सत्ता स्थापन करू द्यावी अशीच जनतेची इच्छा आहे.कॉग्रेस आणि राष्ट्रवादीने गेल्या पंधरा वर्षात राज्यात जो धुमाकुळ घातला होता,त्याला कंटाळून जनतेला भाकरी फिरविली आहे.अशा स्थितीत नाकारलेल्या पक्षांनी सत्तेच्या जवळ जाण्याची कोणतीही कृती किंवा जे सत्तेवर येत आहेत त्यांनी नाकारलेल्या पक्षांची आतून किंवा बाहेरून घेतलेली मदत जनतेला मान्य होणारी नाही.असा प्रय़त्न भाजप किंवा शिवसेनेने ही करू नये.जो पक्ष असा प्रयत्न करेल तो पक्ष भलेही काही काळ सत्तेवर राहिल पण नंतरच्या काळात त्या पक्षाचा मनसे झालेला आपणास दिसेल.परिवर्तनासाठी जनतेनं कौल दिलेला आहे.त्यामुळं भाजप -सेनेने एकत्र येतच सरकार स्थापन करावं असंच जनमानस आहे.ते झालं नाही तर कोणताही अनैसर्गिक प्रय़त्न जनता खपवून घेणार नाही.शिवाय कोणत्याही  दोन  किंवा तीन संधी साधूंचा असा प्रयत्न महाराष्ट्राला स्थिर सरकारही देऊ शकणार नाही.पवारांचे हितसंबंध दुखावताहेत असं दिसताच ते पाठिंबा काढुन घेतील, सरकार कोणत्याहीक्षणी अडचणीत आणतील ,असं केलं नाही तर सरकारला पाच वर्षे  आपल्या तालावर नाचवत राहतील . – पवारांचे कळसुत्री सरकार होण्याचा मार्ग  स्वीकारायचं की,एक पाऊल मागं जात शिवसेनेबरोबर तडजोड करायची याचा फैसला भाजपला घ्यायचा आहे.भाजप-राष्ट्रवादीची अनैसर्गिक युती राज्यातील जनता कोणत्याही स्थितीत स्वीकारणार नाही हे नक्की.

या लेखाची कॉपी आपणास  smdeshmukh.blogspot.in येथून करता येईल.लेख पुनर्मुद्रित करताना कृपया बातमीदारवरून असा उल्लेख करावा.

LEAVE A REPLY