मराठी पत्रकार परिषदेच्या  सोशल मिडिया सेलची स्थापना  मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने घेतले जाणारे पत्रकारांच्या हिताचे निर्णय जास्तीत जास्त पत्रकारांपर्यंत पोहोचावेत,परिषदेच्या उपक्रमांना व्यापक प्रसिध्दी मिळावी,विविध जिल्हा आणि तालुका संघांच्यावतीने सुरू असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माहितीचे आदान-प्रदान करता यावे यासाठी मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने आजपासून सोशल मिडिया सेल सुरू करण्यात येत आहे.परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हा सेल कार्यरत राहिल.या सेलमधील सर्व सदस्यांना प्रत्येक तालुका आणि जिल्हा संघानं आपल्या ग्रुपमध्ये समाविष्ट करून त्यांना सहकार्य करावे अशी विनंती आहे.मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनास व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठीही हा सेल कार्य करणार आहे.या सेलच्या माध्यमातून परिषदला राज्यातील सर्व तालुक्यात पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या सेलमध्ये खालील पत्रकारांची नियुक्ती कऱण्यात येत आहे. १) शरद काटकर ( सातारा ) ९१६८३३६६११ 2) दीपक भागवत (रत्नागिरी) ९४२०९६६६९९ 3) अमर राऊत ( मेहकर ) 9822042258 4) सुनील वाळुंज (पुणे ) 9822195297 5) संतोष खटाल -स्वामी ( बीड ) 9923980099 वरील टीमला सर्वांनी सहकार्य करावे अशी विनंती आहे. मराठी पत्रकार परिषद,मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here