मुंबईः मराठी पत्रकार परिषदेचा 81 वा वर्धापन दिन काल राज्यात विजय दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.त्यानिमित्त राज्यातील विविध जिल्हा आणि तालुका संघांच्यावतीन विजय दिनाच्या निमित्तानं विविध उपक्रम राबविले.
पत्रकारांचा मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिदेची स्थापना 3 डिसेंबर 1939 रोजी झाली आहे.त्यानिमित्त परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यात पत्रकार आरोग्य तपासणी केली जाते.यावर्षी 8 नोव्हेंबर रोजी राज्यात पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला.मराठी पत्रकार परिषदेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि लढयामुळे राज्यात पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला.त्यानिमित्त 3 डिसेबर हा दिवस राज्यात विजय दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय मराठी पत्रकार परिषदेने घेतला होता.
राज्यातील बहुतेक जिल्हा आणि तालुका संघांच्यावतीने विजय दिनाच्या निमित्तानं पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली.पत्रकार संऱक्षण कायद्याची प्रत विविध पोलीस स्थानकात दिली गेली,आपआपल्या गावातील ज्येष्ठ आणि मान्यवर पत्रकारांचे त्यांच्या घऱी जाऊन सन्मान करण्यात आले.रूग्णांलयात फळांचे वाटप करण्यात आले.विविध उपक्रमांनी हा दिवस साजरा केला.परिषदेच्या आवाहनानुसार हा दिवस साजरा केल्याबद्दल परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख,विश्‍वस्त किरण नाईक,अध्यक्ष गजानन नाईक,कार्याध्यक्ष शरद पाबळे,सरचिटणीस संजीव जोशी आणि कोषाध्यक्ष विजय जोशी यांनी राज्यातील पत्रकार तसेच तालुका आणि जिल्हा संघांंना धन्यवाद दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here