परिषदेचा वर्धापनदिन उत्साहात

0
788

मुंबई-मराठी पत्रकार परिषदेचा 76वा वर्धापन दिन आज राज्यात अत्यंत उत्साहाच्या वातावरणात साजरा कऱण्यात आला.वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्यभर पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन कऱण्यात आले होते.या शिबिरालाही अंत्यत चांगला प्रतिसाद मिळाला.चंद्रपूरपासून कोकणातील रत्नागिरी,संगमेश्वरपर्यत 19 जिल्हयात आणि 115 तालुक्यात पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरं घेण्यात आली त्याचा शकडो पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांनी लाभ घेतला.पुणे जिल्ह्यातली बहुतेक तालुक्यात ही शिबिरं यशस्वीपणे पार पाडण्यात आली.जिल्हयातलं मुख्य शिबिर पिंपरी-चिंचवड येथे आयोजित कऱण्यात आलं होतं.तेथे परिषदेचे माजी अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी शिबिराचे उद्धघाटन केले.यावेळी जिल्हा अध्यक्ष शरद पाबळे,कार्याध्यक्ष बापू गोरे,उपाध्यक्ष सुनील वाळूंज ,परिषदेचे प्रसिध्दी प्रमुख श्रीराम कुमठेकर तसेच पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष बाळासाहेब ढसाळ आदि उपस्थित होते.कर्जत येथे परिषदेचे सरचिटणीस संतोष पवार यांच्या हस्ते शिबिराचे उद्धघाटन कऱण्यात आले.रायगड जिल्हयात खालापूर,पेण,रोहा आदि ठिकाणी शिबिरं यशस्वी झाली.बीड जिल्हयातही ठिकठिकाणी शिबिरांचे आयोजन कऱण्यात आले होते.वडवणी येथे वर्धाफन दिनाच्या निमित्तानं विविध स्पर्धाचं आयोजन कऱण्यात आलं होतं.भंडारा येथेही चेतन भैराम यांच्या नेतृत्वाखाली वर्धाफन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान परिषदेच्या आजच्या वर्धापन दिनानिमित्त अनेकांनी परिषदेला शुभेच्छा दिल्या आहेत. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्यावतीनं अध्यक्ष प्रवीण पुरो यांनी दिलेल्या शुभेच्छांमध्ये परिषदेने ग्रामीण भागातील पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी केलेल्या कामाची प्रशंसा केली आहे.पत्रकारांवरील हल्ले तसेच पत्रकार पेन्शन योजनेसाठी परिषेदेच्या पाढाकारने सुरू असलेल्या लढ्याचाही त्याांनी गौरवपूर्ण उल्लेख केला आहे.
शिबिराचे आयोजन करून एक चांगला उपक्रम घेतल्याबद्दल परिषदेचे अध्यक्ष किरण नाईक,कार्याध्यक्ष चंद्रशेखर बेहेरे,सरचिटणीस संतोष पवार,उपाध्यक्ष सुभाष भारव्दाज ,कोषाध्यक्ष सिध्दार्थ शर्मा यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here