मराठी पत्रकार परिषदेच्या सोशल मिडिया सेलची काल मुंबईतील परिषदेच्या काार्यलयात बैठक झाली.सोशल मिडियाचे भविष्याती

 

ल महत्व विचारात घेऊन परिषदेने सोशल मिडिया सेल स्थापन केला असून या सेलच्या माध्यमातून परिषदेच्या कार्याची माहिती सर्वदूर,प्रत्येक तालुक्यातील पत्रकार संघापर्यंत पोहचावी असा प्रयत्न करण्यात येणार आहे.या सेलच्या माध्यमातून परिषदेचे मराठी पत्रकार परिषद हे फेसबुक पेज तयार करण्यात आले असून परिषदेचे ट्ट्विटर अकाउंट देखील सुरू केले जात आहे.मराठी पत्रकार परिषदेची एक वेबसाईट अगोदरच सुरू केली गेलेली आहे.व्हॉटस अ‍ॅपच्या माध्यमातून देखील खेडयातील पत्रकारांनाही परिषदेबरोबर जोडून घेण्याचा प्रयत्न हा सेल करणार असून परिषदेचे उपक्रम,सरकारी योजनांची माहिती,विविध जिल्हा आणि तालुका संघातर्फे सुरू असलेले उपक्रम,आणि अन्य माहितीचे आदान-प्रदान या सेलच्या माध्यमातून केले जाणार आहे.परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कार्यान्वित करण्यात आलेल्या या सेलमध्ये शरद काटकर,दीपक भागवत,संतोष स्वामी,सुनील वाळुंज आणि अमर राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सेलची महत्वाची बैठक काल झाली.यामध्ये विविध विषयांवर चर्चा झाली.परिषेदेचे अधिवेशन येत्या 19 आणि 20 ऑगस्ट रोजी शेगावला होत असल्याने त्याच्या प्रसिद्दीची संपूर्ण जबाबदारी सेलवर सोपविण्यात आली आहे.अधिवेशन अपडेट या मथळ्याखाली दररोजच्या घडामोडींची इत्यंभूत माहिती सर्वसामांन्य सदस्यांपर्यत पोहोचेल याची काळजी सेलच्यावतीने घेतली जाणार आहे.अधिवेशन घर बसल्या बघता यावे यासाठी तंत्रज्ञाानाचा कसा उपयोग करता येईल यादृष्टीनेही चाचपणी केली जात आहे.अधिवेशनातला प्रत्येक क्षण न येणार्‍यांनाही अनुभवता आला पाहिजे असाही परिषदेचा प्रयत्न असणार आहे.त्यादृष्टीने सर्व पातळ्यावर तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.या बैठकीस सेलचे सर्व सदस्य तसेच विश्‍वस्त किरण नाईक,शरद पाबळे,अनिल महाजन,राजेंद्र काळे,अरूण जैन आदि उपस्थित होते..–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here