कोकण ही महापुरूषांची,विदंवानांची,शूर,विरांची भूमी आहे.आकाशाला गवसणी घालणारे असंख्य महापुरूष कोकणानं देशाला दिले.कोकणातील अगदी छोटया छोट्या गावातून पुढं आलेले हे कोकणचे पुत्र स्वकतृत्वानं मोठे झाले पण ते आपल्याच गावात उपेक्षित राहिले.सरकारनंही त्यांची फारशी दखल घेतली नाही.या महापुरूषांचं स्मरण व्हावं यासाठीही काही प्रयत्न झाले नाहीत.त्यामुळे जगभर आपल्या नावाचा दरारा निर्माण कऱणारे हे महापुरूष आपल्याच गावात अनोळखी राहिले.ही खंत राज्यातील पत्रकारांना होती.त्याचं भव्य स्मारक त्यांच्या जिल्हयात व्हावं अशी पत्रकारांची इच्छा आणि प्रयत्न होता.मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघ यासाठी वीस वर्षे पाठपुरावा करतो आहे.संघाचे अध्यक्ष गजानन नाईक आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या प्रयत्नांना आता यश येत असून सरकारने बाळशास्त्रींच्या स्मारकासाठी दीड कोटी रूपयांची तरतूद केली आहे.तो विषय आता मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे.

आपल्या अलौकीक प्रतिभेनं हिंदी पत्रकारितेत आपल्या स्वतःच्या नावाचं युग निर्माण कऱणारे बाबुराव विष्णू पराडकर देखील मालवण तालुक्यातील पराडचे.निसर्गाचा आणि विद्वत्तचेचं वरदान लाभलेलं पराड हे सुंदर गाव.येथे बाबुराव पराडकर याचं स्मारक व्हावं असा प्रयत्न गावाताली नागरिक 1994 पासून करीत आहेत.हा विषय आता मराठी पत्रकार परिषदेने हाती घेतला असून बाबुराव पराडकरांचे त्यांच्या मुळ गावी भव्य स्मारक व्हावे यासाठी परिषद आता प्रयत्न करणार आहे.त्यासाठी युपी सरकारशी संपर्क केला जात आहे.बाबूरावांची सारी हयात युपीत गेली.त्यामुळं या स्मारकासाठी युपी सरकार काही मदत करू शकेल काय या अंगानंही प्रयत्न केले जाणार आहेत.त्याच बरोबर हिंदी भाषिक पत्रकारांची एक बैठक घेऊन त्यांचा सहभाग आणि मदत मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.या स्मारकासाठीही पाठपुरावा कऱण्याचा निर्णय परिषदेने घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून परवा मी,किऱण नाईक,मिलिंद अष्टीवकर,समीर देशपांडे गजानन नाईक आदिंनी पराडला जाऊन माहिती घेतली आहे.त्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम पराडकर यांच्याशी चर्चा करून त्यांचीशीही चर्चा केली.त्यांनीही मदतीचे आश्‍वासन दिले आहे.बाळशास्त्रींच्या स्मारकासाठी वीस वर्षे लागली.त्या पार्श्‍वभूमीवर पराडकरांच्या स्मारकाचा पाठपुरावा करावा लागणार आहे.( एस.एम.)

LEAVE A REPLY