परभणी- पत्रकार रस्त्यावर

0
847

पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्याच्या विरोधात परभणीतील पत्रकारांनी आज संपूर्ण जिल्हयातील तहसिल कार्यालयं तसेच परभणी येथील जिल्हाधिकारी कार्याालयासमोर धऱणे आंदोलन करून आपल्या एकीचे दर्शन घडविले.पाथरी,सोनपेठ,सेलू. पुर्णा जिंतूरसह सर्वच तालुक्यात पत्रकारांचे हे आंदोलन यशस्वी झाले.आपआपल्या संघटनेच्या चपला बाजुला ठेवत पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या झेंडयाखाली हे आंदोलन कऱण्यात आले.
दोन दिवसांपुर्वीच जिंतूर तालुक्यातील पत्रकार राजू देशमुख आणि त्यांच्या पत्नीवर गावगुंडांनी हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले.त्यामुळे परभणीतील पत्रकार संतप्त झाले होते.त्याचे प्रतिबिंब या आंदोलनात दिसून आले.गेल्या काही दिवसात परभणीतील पत्रकारांवर होणा़ऱ्या हल्ल्याच्या घटनात चिंताजनक वाढ झाली आहे.पोलिसांचाही वचक राहिलेला नाही असे वारंवार दिसून आले आहे.गेल्या काही दिवसात जिल्हयात पत्रकारांवरील हल्लयाच्या दहा ते पंधरा घटना घडल्या आहेत.पत्रकारांनी एकत्र येत हल्ल्‌याच्या विरोधात आवाज उठविल्याबद्दल जिल्हयातील तमाम पत्रकारांचे मनःपूर्वक आभार.हीच एकजूट कायम ठेवत आपली लढाई पुढे न्यायची आहे.जिल्हयातील सर्वछ पत्रकारांनी पत्रकार संरक्षण कायद्याची मागणी केली असून या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्र्यांकडे रवाना करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here