चिंता वाढविणारी बातमी
परभणीत पत्रकाराची आत्महत्या

परभणी
कोरोनाचं संकट किती व्यापक आणि गहिरं होत चाललं आहे यावर प्रकाश टाकणारी आणि तमाम पत्रकारांची चिंता वाढविणारी बातमी परभणीहून आली आहे..
अरूण हिस्वणकर हे परभणीचे पत्रकार.. 22 वर्षे एका मान्यवर दैनिकात नौकरी करून मान्यता मिळविलेले. .. मात्र गेल्या मार्च मध्ये पहिल्यांदा लॉकडाऊन लागले.. अनेक दैनिकांच्या व्यवस्थापनांना ही पर्वणी वाटली.. 20-20 वर्षे नोकरी केलेल्या आणि पर्मनन्ट असलेल्या अनेक पत्रकारांना निर्दयपणे घरचा रस्ता दाखविला गेला.. असे करताना 40-45 वर्ष वयाचे हे पत्रकार कुठे जातील? , जगतील कसे? याची जराही चिंता करण्याची गरज मॅनेजमेंटला वाटली नाही.. अरूण हिस्वणकर व्यवस्थापनाच्या निर्दयपणाचे असेच बळी ठरले.. त्यांचा राजीनामा घेतला गेला.. सारं कुटुंब नोकरीवर अवलंबून.. अन तीच गेल्यावर मग करायचं काय? इलाज नाही म्हणून हिस्वणकर यांनी एका स्थानिक दैनिकात नोकरी पत्करली मात्र तेथील तुटपुंज्या पगारावर घराचा गाढा ओढणे अशक्य झाल्याने, आणि आर्थिक विवंचनेला कंटाळून अरूण हिस्वणकर यांनी आज आत्महत्या केली..
एक तरूण आणि मनमिळावू पत्रकार असा अवचीत निघून गेल्याने परभणीच्या माध्यम जगतात हळहळ व्यक्त होत आहे..
सरकार आणि व्यवस्थापनाच्या नाकर्तेपणाचा हा बळी असल्याची प़तिक़िया एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केली.. संकट कितीही गहिरे असले तरी आत्महत्या हा पर्याय नसल्याने पत्रकारांनी धैर्याने प्रसंगाला तोंड द्यावे, आपल्या मागे आपले कुटुंब आहे याची जाणीव ठेवावी असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.. हा काळोख संपेल आणि लवकरच सुर्योदय होईल असा विश्वास ही देशमुख यांनी व्यक्त केला आहे..
दोन दिवसांपुर्वी सोलापूर येथील एका पत्रकाराने आत्महत्या केली होती.. त्यानंतर ही घटना घडल्याने राज्यभर चिंता व्यक्त होत आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here