पनवेल नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदिल दाखविल्याने सोमवारी त्याबाबतची अधिसूचना निघणार असल्याचे समजते.सध्याची नगरपालिका आणि परिसरातील तळोजा,खारघर,कामोठे,कळंबोली,बोनशेत ,पळस्पे,नेवाळी आदि गावांचा नव्या महापालिकेत समावेश असणार आहे.पनवेल महापालिका होऊ शकते काय याचा अभ्यास करण्यासाठी विभागीय आयुक्त तानाजी सत्रे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती.या समितीने दिलेला अहवाल नगरविकास विभागाने स्वीकारला आहे.त्यामुळे पनवेल महापालिका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.पनवेल नगरपालिका हद्दीबाहेरची 68 गावे नव्या महापालिकेत समाविष्ठ केली जाणार आहेत.पनवेल ही रायगड जिल्हयातील पहिली महानगरपालिका असणार आहे.–