पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी

2
1443
पनवेल तालुक्यात गेले काही दिवस वृत्तपत्र कार्यालय जाळणे, वृत्तपत्रांच्या प्रतिनिधीना जाळण्याच्या भाषा करणे, बातम्या संदर्भात शहानिशा न करता धमक्या देणे अशा घटनांमध्ये वाढ झाली असल्याने पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. साप्ताहिक आदिवासी सम्राटचे संपादक गणपत जानु वरगडा यांना वनखात्याच्या भ्रष्टाचाराबद्दल प्रकाशित केलेल्या बातमीबद्दल वनपाल यांनी फोनवरून जातीवाचक व अश्लील भाषा वापरून जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. त्याबद्दल पनवेल तालुका पत्रकार संघर्ष कृती समितीने विशेष दक्षता घेऊन वारगडा यांच्या समवेत नवीन पनवेल पोलिस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज दिला असून कडक कारवाई करण्याची मागणी धमकी देणाऱ्या कुटुंबीयांवर करावी.
पनवेल तालुक्यातील मालडूंगे परिसरातील राहणारे आदिवासी सम्राट या साप्ताहिकाचे संपादक गणपत जानू वारगडा यांनी आपल्या ११ एप्रिल ते १७ एप्रिलच्या वृत्तपत्रामध्ये तेरी भी चूप मेरी भी चूप या मथळ्याखाली वन खात्याच्या भ्रष्टाचाराबाबत बातमी प्रसिद्ध केली होती. हि बातमी वाचून वन खात्यातील वनपाल श्री. ठाकूर यांच्या मुलाने गणपत वारगडा यांना फोन करून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून, जातीवाचक शिवीगाळ करून तू भेटशील तिथे मारील अशी धमकीही दिली. वनपाल ठाकूर, त्यांचा मुलगा आणि पत्नीने जीवे ठार मारण्याची धमकी गणपत वारगडा यांना फोनेवरून दिली. यासंदर्भात गणपत वारगडा यांनी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीकडे या संदर्भात चर्चा करून मला या संदर्भात योग्य न्याय मिळावा अशी इच्छा व्यक्त केली त्यानुसार पत्रकार संघर्ष समितीच्या पाठींब्याने गणपत वारगडा यांनी ठाकूर यांच्याविरोधात नवीन पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. तरी यासंदर्भात नवीन पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकानी गांभीर्याने लक्ष घालून पत्रकारांना धमक्या देणाऱ्या या ठाकूर कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करून योग्य ती कडक कारवाई करावी अन्यथा पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती उपोषणाचा मार्ग अवलंबवेल. गणपत वारगडा यांनी तक्रार अर्ज दाखल करताना पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे सरचिटणीस निलेश सोनावणे, जेष्ठ पत्रकार गणेश कोळी, दीपक महाडिक, अरविंद पोतदार, प्रसिद्धी प्रमुख केवल महाडिक, विजय पवार,भालचंद्र जुमलेदार, सय्यद अकबर, किरण बाथम, शैलेश जोशी आदि पत्रकार उपस्थित होते.

2 COMMENTS

  1. पञकारांना धमक्या देणा-यांना पञकारांनी चांगलाच धडा शिकवा…. त्यासाठी सर्व पञकारांनी एकञ येणे गरजेचे आहे.
    जसे पनवेल मध्ये घडलेल्या घटनेत सर्व पञकार एकञ आले, तसेच सर्व ठिकाणी एकञ येणे आवश्यक आहे. आणि ती काळाची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here