पद्मश्री डॉ.मुझ्झफर हुसेन यांना लोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार

  0
  837

  राज्य शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2014 जाहीर
  मुंबई, दि. 17 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत देण्यात येणारा लोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री डॉ. मुझ्झफर हुसेन यांना जाहीर करण्यात आला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2014 देखील आज जाहीर करण्यात आले. दि. 1 डिसेंबर, 2015 रोजी सायंकाळी 6.00 वाजता सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
  लोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार 2014, रुपये एक लाख व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तसेच 2014 साठीचे राज्यस्तर आणि विभागीय स्तरावरील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार पुढीलप्रमाणे :
  राज्यस्तरीय पुरस्कार
  आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) श्रीमती जान्हवी विनोद पाटील, दै.तरुण भारत, रत्नागिरी; अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर) 41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) श्रीमती अनन्या दत्ता, दै. टाइम्स ऑफ इंडिया, पुणे; बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर) 41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) श्री.मुकेश रामकिशोर शर्मा, दै.लोकमत समाचार, गोंदिया; मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू) (राज्यस्तर) 41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) श्री.शेख प्यार मोहम्मद सायं दै.नांदेड रहेबर, नांदेड; यशवंतराव चव्हाण पुरस्कार, शासकीय गट (मराठी) (मा. व ज.) (राज्यस्तर) 41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) श्री.प्रशांत आनंदराव सातपुते, माहिती अधिकारी, सातारा; पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर) 41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) श्री.संतोष मधुकर लोखंडे, झी 24 तास, बुलडाणा; तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर) 41 हजार रुपये, (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) श्री.विद्याधर रघुनाथ राणे दै.सकाळ, मुंबई; केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (मा.व ज.) (राज्यस्तर) 41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) श्री.विजय वैजनाथअप्पा होकर्णे, छायाचित्रकार, जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड; सोशल मीडिया पुरस्कार (राज्यस्तर) 41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) श्री.आशिष अरविंद चांदोरकर, मुख्य उपसंपादक, महाराष्ट्र टाइम्स, (ऑनलाईन) पुणे.
  विभागीय स्तरावरील पुरस्कार
  दादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, यापैकी रुपये 10 हजार दै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत.) श्रीमती चारुशीला सुभाष कुलकर्णी, वरिष्ठ वार्ताहर, दै.लोकसत्ता, नाशिक; अनंतराव भालेराव पुरस्कार, औरंगाबाद विभाग (लातूरसह) 41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) श्री.हरी रामकृष्ण तुगांवकर, दै.सकाळ, लातूर; आचार्य अत्रे पुरस्कार, मुंबई विभाग 41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) श्री.संजय कृष्णा बापट, विशेष प्रतिनिधी, दै.लोकसत्ता, मुंबई; नानासाहेब परूळेकर पुरस्कार, पुणे विभाग 41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) श्री.योगेश सोपान बोराटे, बातमीदार, दै.महाराष्ट्र टाइम्स, पुणे; शि.म.परांजपे पुरस्कार, कोकण विभाग 41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) श्री.दिलीप शांताराम शिंदे, दै.सकाळ, दै.पुढारी, ठाणे; ग.गो.जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग 41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) इंदूमती गणेश (सुर्यवंशी), वार्ताहर-उपसंपादक, दै.लोकमत, कोल्हापूर; लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग 41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) श्री.हर्षनंदन सुरेश वाघ, प्रतिनिधी, दै.लोकमत, बुलडाणा; ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग 41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) श्री.प्रवीण श्रीराम लोणकर, दै.महाराष्ट्र टाइम्स, नागपूर यांना जाहीर झाले आहेत.
  उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2014 साठी समिती अध्यक्ष म्हणून महासंचालक (माहिती व जनसंपर्क), सदस्य सचिव संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) यांनी तर सदस्य म्हणून सर्वश्री. चंदन शिरवाळे, गजानन निमदेव, संतोष प्रधान, अनुराग त्रिपाठी, श्रीपाद अपराजित, सुरेंद्र गांगण, अजिज एजाज, दीपक भातुसे, श्रीमती मनिषा रेगे यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here