पत्रकार हल्ले निर्णायक लढा हवा

0
919

तुम्हाला काय वाटतं ?
महाराष्ट्रात आज आणखी दोन पत्रकारांवर हल्ले झाले.एक हल्ला श्रीगोंदा येथील पत्रकार संतोष भागवत यांच्यावर झाला तर दुसरा रत्नागिरी येथील मेरा भारत समाचार या चॅनलच्या ब्युरो चीफ मयुरी सुपल यांच्या घरावर झाला.रत्नागिरीच्या जवळ असलेल्या नाचणे येथील ग्रामपंचायतीने त्यांचे गडगा बेकायदेशीररित्या तोडल्याने सुपल यांनी पोलिस अधीक्षकांकडे त्याची तक्रार केली.त्यामुळे काही हितसंबंधी मंडळी भडकली आणि त्यांनी सुपल यांच्या घरावर सशस्त्र हल्ला चढविला.आता त्यांच्या घरासमोर पोलिस तैनात कऱण्यात आले आहेत. गेल्या पंधरा दिवसातील महिला पत्रकारावर झालेला हा तिसरा हल्ला असल्याने चिंता वाढली आहे.यापुर्वी पनवेल आणि पुण्यातील महिला पत्रकारांवर किंवा त्यांच्या घरावर हल्ले झालेले आहेत.
भाजपचे सरकार आल्यानंतर राज्यात गेल्या महिनाभरात बारा पत्रकारांवर हल्ले झाले आहेत.अगोदर हल्ल्याचे सरासरी मासिक प्रमाण चार ते पाच असायचे मात्र एकाच महिन्यात बारा पत्रकारांवर हल्ले व्हायची ही पहिलीच वेळ आहे.यातून परिस्थितीचे गाभीर्य लक्षात यावे.वरील दोन्ही हल्ल्लयाचा राज्यभर निषेध होत असला तरी असे शाब्दिक निषेधही आता टिंगलीचे विषय झाले आहेत.आपण निषेध करतो आणि सरकार मख्ख बसून असते.तेव्हा आता थेट ऍक्शन करण्याचा निर्णय घ्या असा सूर व्यक्त होत आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने देखील आता निर्णायक लढा उभारण्याची तयारी करावी लागेल.या ंसंदर्भात येत्या दोन दिवसात सर्व सदस्यांशी बोलणी करून अंतिम निर्णय घेतला जाईल.
समितीचा निर्णय़ झाल्यानंतर राज्यातील पत्रकारांना चलो नागपूरचा नारा देत नागपूरकडे कूच करावी लागेल.मागे आपण कराडला तत्कालिन मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन केले होते.आता नागपूरला मुख्यंमंत्री फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलन करण्याची वेळ आली आहे.असा निर्णय घेतला गेला तर तो किती पत्रकारांना मान्य असेल ,कृपया आपली मतं नोंदवावीत.16 तारखेला हे आंदोलन करावे अशी सूचना आहे.राज्यातील प्रत्येक गावातून पत्रकारांनी या आंदोलनात सहभागी व्हावे लागेल तरच सरकारला दणतुम्हाला काय वाटतं ?का बसेल.अन्यथा असेच हल्ले होत राहतील हे नक्की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here