पत्रकार सुभाष भारव्दाज यांच्या मुलाचे लंडनला निधन

0
950
मराठी पत्रकार परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार श्री.सुभाष भारव्दाज यांचे ज्येष्ठ चिरंजीव कपिल भारव्दाज यांचे आज लंडन येथे अल्पशा आजाराने आकस्मिक निधन झाले.ते 31 वर्षांचे होते.साधारणतः सहा महिन्या पूर्वीच कपिल भारव्दाज एक मल्टी नॅशनल कंपनीच्यावतीने लंडनला सपत्निक गेले होते.किरकोळ आजारी पडल्यानंतर त्याना रूग्णालायात दाखल कऱण्यात आले होते.मात्र उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली.कपिल भारव्दाज यांच्या पश्‍च्यात आई,वडिल,पत्नी,लहान भाऊ,भावजई असा परिवार आहे. कपिल यांचे पार्थिव मंगळवार किंवा बुधवारी पुण्याला आणले जाणार आहे.मराठी पत्रकार परिषद परिवार भारव्दाज कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे. कपिल भारव्दाज यांना विनम्र श्रद्धांजली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here