पत्रकार सुंदर लटपटे यांची आत्महत्या

0
1532

पत्रकार सुंदर लटपटे यांची आत्महत्या

औरंगाबाद :आर्थिक चणचण आणि कौटुंबिक वादातून नैराश्य आलेल्या पत्रकार सुंदर लटपटे यांनी काल आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेनं माध्यम क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दैनिक मराठवाडय़ातून पत्रकारितेला सुरूवात केल्यानंतर सुंदर लटपटेंनी अनेक चढउतार अनुभवले. पुढारी, पुण्यनगरी, लोकपत्र अशा देनिकात काम केलेल्या लटपटे यांनी एकलव्य प़काशन सुरू केले आणि त्यात मोठे यश मिळविले. त्याच वेळी महाराष्ट्र नावाचे एक साप्ताहिक देखील चालविले. मात्र पुन्हा ते पत्रकारितेत आले..
सुंदर लटपटे यांचा आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता. त्यामुळे काही कौटुंबिक वाद होते.. त्यातच आर्थिक अडचणीमुळे त्यांनी आतमहतयेसारखं टोकाचं पाऊल उचलले असे सांगितले जाते. त्यांनी लिहिलेली सुसाईड नोट मिळाली आहे. बातमीदार भावपूर्ण श्रद्धांजली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here